पुणे, १ नोव्हेंबर २०२५
निसार फाउंडेशन सेंटर फॉर वोकेशनल ट्रेनिंगतर्फे तिसरा कन्वोकेशन डे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
एक नोव्हेंबर रोजी संम्पन्न झालेल्या या उत्साही कार्यक्रम प्रसंगी संस्थेतील एकूण ४९ विद्यार्थी नर्सिंग आणि DMLT कोर्समध्ये, फ्री कॉम्प्युटर कोर्सचे ४० विद्यार्थी, मेहेंदी कोर्सचे ३० विद्यार्थी, तसेच टेलरिंग कोर्सचे १५ विद्यार्थी यांना प्रमाणपत्रे व ट्रॉफी देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून प्रो. मुज्तबा लोखंडवाला (मोटिव्हेशनल गाईड आणि मेंटर), प्रफुल्ल शशिकांत (फाउंडर डायरेक्टर, वोपा), विनायक कदम (COO, वोपा), अनीस कुट्टी (फाउंडर, अनीस डिफेन्स अकॅडमी) आणि गफ्फार शेख (फाउंडर प्रेसिडेंट, अलखैर) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि प्रोत्साहनपर संदेश दिला.
यावेळी माजी नगरसेवक गफुर पठान, माजी नगरसेवक हाजी फिरोज, माजी नगरसेवक रईस सुंडके, जाहिद भाई, समीर पठान, मजहर मनियार, समीर पंजाबी, अली भाई, शेर अली, जाकिर नदाफ, शाकिर भाई भंगरवाला इत्यादिंची उपस्थिती होती.
तर शबाना मेमन (फ्यूचर फाउंडेशन), अली सर (कराटे टीचर), मुजाहिद रायली सर, सूफियान साहेब (एकता स्पोर्ट्स फाउंडेशन), समीर शेख (अलखौर) आणि समीर खान (कंचवाला) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहिले.
निसार फाउंडेशनतर्फे हरीस शेख, अकबर खान, मुश्ताक झिक्र, अबुल कलाम खान हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन चंदभाई बलबट्टी यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि निसार फाउंडेशनचे फाउंडर प्रेसिडेंट हाफिज शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आणि पुढील वाटचालीसाठी मार्गदर्शन केले.
