कोंढव्यात रमजान महिन्यानिमित भोजन थाळी केंद्र सुरू करण्याची मागणी

पुणे-दि.२६,एप्रिल,प्रतिनिधी: रमजान महिन्यानिमित शिव भोजन थाळी केंद्र सुरू करण्याची मागणी इनक्रेडिबल समाजसेवक गृप.चे असलम इसाक बागवान यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.
२५ एप्रिल पासून रमजान महिना सुरू झालेला आहे. कोरोनाच्या महामारीमुळे खबरदारी म्हणून लॉकडाऊन सुरू असल्याने अनेक भाग सील आहेत.त्यामुळे या भागातील बेरोजगार,कारागीर कामगार हवालदिल झालेले आहत,अशावेळी शासनाची शिवभोजन थाळी केंद्राचा परप्रांतीयांना व रिक्षा चालक सारख्या लोकांना याचा फ़ार मोठा आधार बनला आहे. सध्याची परिस्थिती पाहता कांहीं ठिकाणी नव्याने केंद्र सुरू करण्याची गरज निर्माण झंलेली आहे.रमजान महिना सुरू असल्याने  या भागात शिवभोजन थाळी केंद्र  सुरू करावी अशी मागणी कोंढवा येथील इनक्रेडिबल समाज सेवक गृप.च्या वतीने असलम इसाक बागवान यांनीमुख्यमंत्री उध्दव ठाकरे व  उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्याकडे केली आहे.

प्रती

पालकमंत्री,उपमुख्यमंत्री (अजितदादा पवार)

पुणे जिल्हा, महाराष्ट्र,
विषय = भोजन थाळी केंद्र सुरू करणे बाबत,
महोदय,

आपणास महाराष्ट्र व विषेश करून पुणे जिल्ह्यातील मतदात्यांनी भरगोष मते व प्रेम दिलेले आहे.

खासकरून मुस्लिम समाजाने आपणास व् साहेबांच्या आदर्शावरच वाटचाल केलेली आहे.
दिनांक २५/४/२०२० पासुन पवित्र रमजान महिना सुरू होत आहे. आपणांस माहिती आहेच या महिन्याच्या गरजा. सध्येच्या लाँकडाउन मुळे सर्वच बेरोजगार व हवालदिल झालेले आहेत,
आपण उपमुख्यमंत्री व पुणे जिल्हाचे पालकमंत्री आहात, आम्हा सर्व बांधवाची आपणाकडुन खुप अपेक्षा आहेत. आपण शासना मार्फत व आपल्या खासदार, आमदार, नगरसेवकां व पदाधिकारी मार्फत सर्व समाजातील गरजु व्यक्ती पर्यंत मदत या रमजान महिन्या करिता पोहचवावी हि विनंती.
                                                                              वरील आशयाचे निवेदन देण्यात आलेले आहे.              
                               
                                                                                                      
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने