भावी नगरसेवक हेमंत दत्तात्रय बधे यांचा वाढदिवस रक्तदान शिबीर घेवुन साजरा

पुणे - कोंढवा येथील भावी नगरसेवक तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे समाजसेवक हेमंत काका दत्तात्रय बधे यांचा वाढदिवस खडी मशीन चौकात त्यांच्या संम्पर्क कार्यालयात रक्तदान शिबीर घेवुन व विविध सामाजिक कार्यक्रमानी साजरा करण्यात आला.

:वाढदिवसचा केक कापताना प्रशांत दादा जगताप व मान्यवर 

: शुभेच्छा देताना मा.आमदार महादेव बाबर, प्रशांत जगताप व इतर 

दि.10, ऑक्टोबर रोजी हेमंत दत्तात्रय बधे यांच्या वाढदिवस निमित्त दिवसभर कै.रामदास बधे प्रतिष्ठान व त्यांच्या कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त पणे कार्यक्रमाचे आयोजन केले होते. खडी मशीन चौकातील कार्यालय समोर फटाकांच्या आवाजात आणि dj च्या संगीतमय वातावरणात केक कापून वाढदिवस साजरा केला गेला. या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थितींना तुळस रोप देवून त्यांचा सत्कार सन्मान हेमंत काका बधे यांनी केला.तर अयोध्या मूकबधिर शाळा ट्रस्ट च्या मुलांना जेवणदान दिले.

- हेमंत काका बधे अयोध्या मुखबधिर ट्रस्ट च्या मुलांना जेवण देताना 

त्याचप्रमाणे शरद पवार  राष्ट्रवादी पार्टीचे हडपसर विधानसभा इच्छुक आणि भावी आमदार माजी महापौर प्रशांत दादा जगताप यांच्या प्रचाराचे पोस्टर्स स्टिकर रिक्षाना लावून प्रशांत जगताप यांच्या हस्ते पोस्टर्सचे अनावरण ही करण्यात आले.

   : व्हिडिओ- वाढदिवसाच्या शुभेच्छा व प्रतिक्रिया देताना 

वाढदिवसां निमित्याने त्यांना भेटून शुभेच्छा देण्यासाठी उंबाठा शिवसेना माजी आमदार महादेव अण्णा बाबर, भावी आमदार माजी महापौर प्रशांत दादा जगताप,भारतीय जनता पार्टी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष जालिंदरभाऊ कामठे, नगरसेवक योगेश ससाने ,डॉ सेल चे सुनील जगतात, अभिमन्यु दादा भांनगिरे , संदिपनाना बधे, नरेंद्र शेठ मरळ, मनसेचे अमित जगताप, माऊलीभाऊ भोईटे, महेश शेठ  भोईबार,अमरदादा कामठे यासह अनेकांनी भेटी दिल्या.

सायंकाळी 5:30 वाजता आभार व्यक्त करून कार्यक्रम संपला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post