रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या रास्ता पेठ शाखेचे उद्घाटन उत्साहात संपन्न


पुणे दि. २५- रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या रास्ता पेठ शाखेचे उद्घाटन रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी डॉ. अमोल देवळेकर, पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे साठे, शाखेच्या मुख्य संयोजक रेश्मा जांभळे, संगीताताई रुद्राप, शारदाताई लडकत, अरुणाताई बकरे, गौरव चव्हाण, मल्हार कदम, अमृता जाधव, दिलीप ओव्हाळ, श्याम पुणेकर, सलीम शेख, प्रभाताई अवलेलू प्रमुख उपस्थित होते. यावेळी युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

'मोफत उपचार - माझा अधिकार' या घोषवाक्यासाठीची जनजागृती करण्यासाठी आणि कॅन्सर मुक्त महाराष्ट्र अभियानांतर्गत कॅन्सरच्या शस्त्रक्रिया मोफत करण्यासाठी रुग्ण हक्क परिषद रास्ता पेठ शाखेच्या वतीने कॅन्सर रुग्णांची सदस्य नोंदणी सुरवात करण्यात अली.

यानंतर २७ जानेवारी25  रोजी फालेनगर आंबेगाव बुद्रुक या ठिकाणी शाखांचे उद्घाटन परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी परिषदेच्या सर्व कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे, असे परिषद च्या वतीने आवाहन करण्यात आले आहे. 

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items