पुणे:पुण्यातील कोंढवा खुर्द येथे अब्दुल कलाम जयंती सप्ताह निमित्य सात दिवस विविध सामाजिक उपक्रम घेण्यात आले.
सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी शनिवार दि.७ नोव्हेंबर रोजी लायन्स क्लब बल्ड बँक, हम भारतके लोग, भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद विचार मंच आणि इनक्रेडिबल समाजसेवक गृप यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला
या वेळी मौलाना अब्दुल कलाम यांच्या विचारधारेशी सुसंगत प्रेमींनी रक्त दान करून आपला जयंती सप्ताहात सहभाग घेतला.
या कार्यक्रमात समाजसेवक सिकंदर पठाण, खान मोहम्दिन, इब्राहिम खान, डाँ रियाज उद्दिन, नासिर शेख मौलाना इमरान, इब्राहिम शेख, राजू सय्यद, शानु पठाण, नासिर शेख, समिर शेख, साहिल मणियार, अमोल शेरकर, सत्यवान तांबे, हाजी युन्नुसखान (नुरी मंडप) विना कदम, समिना मेमन, आणी लायन्स क्लब बल्ड बँकेचे अटेंडन डाँक्टर व कर्मचारी यांच्या सहयोगाने रक्तदान शिबिर यशस्वी पार पडले.