आलूर - मुंबई कुर्ला बस सुरू करण्यात आल्याने आलूर व परिसत आंनदाचे वातावरण


 आलूर रसत्यावर खड्डे पडल्याने बंद करण्यात आलीली बस पुन्हां सेवेत. 

आलूर दि.०२ डिसेंबर (लकी गुरवे यांजकडून)
आलूर-मुंबई बस सेवेमुळे या भागातील सात ते आठ गावच्या प्रवाशांची पुणे मुंबई सोलापूर ला जाण्या-येण्याची गैरसोय दूर झाल्याने आलूर व परिसरत आंनद व्यक्त करण्यात येत आहे. 
उमरगा तालुक्यातील आलूर येथे दि.१ दिसेम्बर 2023 रोजी ग्रामस्थांच्या वतीने अक्कलकोट आगारच्या स्लीपर बसचे आगमन होताच बस चालक, वाहक व डेपो व्हाईस मॅनेजर यांचा सत्कार करून त्यांचे आभार मानण्यात आले. बसचे विधिवत पूजन करून ग्रामस्थांच्या वतीने मुंबईच्या दिशेने सायंकाळी 7 वाजता बस मार्गस्थ करण्यात आली.
ग्रामस्थ आलूर-मुंबई बस चे स्वागत करताना

आलूर हे उमरगा तालुक्यातील शेवटचे आणि  अक्कलकोट, लोहारा, तुळजापूर, आळंद (कर्नाटक) इत्यादी तालुक्याच्या सीमेवरचे गाव असून येथील साधारणतः 18 ते 20 हजारच्या जवळपास लोकसंख्या आहे येथे दर शुक्रवारी आठवडी बाजार असतो.
सात ते आठ गावाच्या नागरिकांचा या ना त्या कारणाने येथे दैनंदिन सम्पर्क असतो.
 शुक्रवारचा आठवडी बाजार, पशु बाजार, असतो.या भागातील नागरिकांना मुंबई पुणे कडे जाण्या येण्यासाठी उमरगा अक्कलकोट किंवा जळकोट आशा दूर ठिकाणी रात्री बेरात्री जाणे खर्चिक आणि गैर सोईचे होत असे.त्यामुळेही  स्लीपर आरामदायी बस नागरिकांच्या दृष्टीने महत्वाची आणि फायद्याचे ठरणार आहे.
यापूर्वी अक्कलकोट आगाराची साधी अराम बस चालू होती.परंतु अक्कलकोट ते आलूर जागोजागी रसत्यावर खड्डे पडल्याने ती बंद करण्यात आली होती. परंतु आता सद्या रस्त्याचे काम पूर्ण दुरुस्त झालेले आहे. ग्रामस्थांच्या विनंतीनुसार अक्कलकोट डेपो मेनेंजर व त्यांचे पथक येवून प्रइतक्ष पाहणी करून ग्रामस्थांसोबत चर्चा करून सर्व अहवाल समाधानकारक असल्याने पूर्ववत बस सुरू केली आहे.
 ग्रामसेवक  ग्रामपंचायत सदस्य सरपंच उपसरपंच सह  अनेकांचे सहकार्य मीळाल्याचे सागर उमशटे यांनी सांगितले.

 यावेळी बस चालक, वाहक, डेपो मॅनेजर, मा.काँग्रेस युवा नेते प्रकाशजी वाकडे, व्हाट्टे गुरुजी, सिद्धप्पा अण्णा ब्याळीकुळे, शिवराज काशेट्टी सर, नागेश गुंडगे ग्रामपंचायत सदस्य कल्याणी लाटे,सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बिऱ्हाडे,मुकुंद क्षीरसागर, सदन शेतकरी हणमंत वाडीकर, युवा कार्यकर्ते अमृत गुरव, इरण्णा मातोळे,सिद्धप्पा बेळीकुळे, वाहक अली दर्जी, गुरबसया स्वामी, हनमू मुनाळे, ग्रामपंचायत कर्मचारी स्वामी, अनवर जेवले, माजी उपसरपंच राम जेऊरे यासह बहुसंख्य ग्रामस्थ उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने