कोंढवा खुर्द येथे पहिले शिक्षण मंत्री भारत रत्न मौलान अबुल कलाम आझाद यांच्या 133 व्या जयंती निमित्य इनक्रेडिबल समाजसेवक गृप च्या वतीने दिनांक 4 नोव्हेबर ते 11/नोव्हेबर 2021 दरम्यान विविध सामाजिक उपक्रम राबवून जयंती सप्ताह साजरा करण्यात आला.


भारताचे पहिले शिक्षण मंत्री भारत रत्न मौलाना अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आणि देश प्रेमाचा इतिहास नवीन पीडिला माहिती व्हावा म्हणून त्यांच्या जयंती निमित्य त्यांच्या जीवन कार्यावर आधारित विधायक विविध कार्यक्रम घेवून प्रथमच जयंती सप्ताह साजरा करण्यात आला.

या मध्ये मोफत आरोग्य तपासणी, रक्तदान शिविर, महिला सबलिकरण व मार्गदर्शन, जेष्ठ नागरीकांचा सन्मान, सफाई कर्मचारी व घरकाम करणाऱ्या महिलेंना साडी वाटप व गरजु महिलांना सबलिकरणाच्या दृष्टिने शिलाई मशीन वाटप , लहानमुलांना खाऊ वाटप तर असंघटित कामगार यांना फळ वाटप करून जयंती सप्ताह साजरा करण्यात आला.
तसेच समाज प्रबोधन, व्याख्यानासोबत मौ आझाद यांच्या जिवनी विषयी माहिती सोबत विविध योजानाच्या माहितीचा भरगच्च आणि समाजास तसेच तळागाळातील नागरीकांचा, लहान मुले, तरूण जेष्ठ नागरिक, महिला यांच्या हक्क आणि अधिकार यांचा विचार करून मौलाना या कार्यक्रमासाठी. कोंढवा पोलिस स्टेशन के मा, सरदार पाटिल साहेब, कोंग्रेस चे जेष्ठ नेते माजी आमदार, मोहन दादा जोशी साहेब, जेष्ठ समाजसेविका, मेधाताई पाटकर, पौर्णिमा ताई माजी नगरसेविका आरती ताई बाबर, मेधाताई बाबर, स्वालेहा शेख , सुभाष वारे सर ,आमदार चेतन दादा तुपे धनंजय खोले शहर अभियंता पुणे महानगरपालिका तसेच टिळेकर, श्रध्दा, पुजा मँडम आशा विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहुन मार्गदर्शन केले.
Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने