आमदार चौगुलेंच्या ग्रुपवर स्वामी 1 नंबर वर...

 

आलूर - मल्लिनाथ गुरवे,

निवडणुकीची रणधुमाळी सुरू आसुन   प्रचार वेगाने सुरु आहे. मतदारांना सभेतून कॉर्नर बैठकातून आश्वासने दिली जात आहेत. आमचा शब्द, आमची गॅरंटी, आमचीच सत्ता येणार, असे दावे केले जात आसुन  आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी ही झडत आहेत. 

उमरगा लोहारा तालुक्यात ज्ञानराज चौगुले हे शिवसेना आमदार म्हणून तीन वेळा राखीव मतदार संघातून यशस्वीपाने निवडून आले आहेत. आणि ते आता पुन्हा चौथ्यानंदा नशीब अजमावत आहेत.

यावेळी शिवसेनेत उभी फूट पडल्याने शिवसेनेत गाढा-गाडीची गद्दाराची आणि  निष्टेची भाषा वापरली जात आहे. ज्ञानराज चौगुले हे शिंदे गटातुन पुन्हा आता चौथ्यानंदा उभे आहेत. शिवसेनाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोहारा येथे दि. 12 रोजी सभेतून त्यांना गद्दार अशी उपमा देवून त्यांना गाढण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले आहे. त्यामुळे ठाकरे शिवसैनिकांची भूमिका महत्वाची असेल. तर दुसरीकडे माजी खासदार रवींद्र गायकवाड आणि चौगुले आमदार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

2019 ची आणि 2024 ची परिस्थिती वेगळी आहे 

शिवसेनेच्या विभागणीमुळे शिंदे आणि ठाकरे गटात झालेले मत विभाजन आणि कांही मतदारांची नाराजी यामुळे आमदार चोगुले यांना ही चौथी निवडणूक तारणार की नाराजी नडणार हे निकाला नंतरच अमजू शकेल. 

आमदार चौगुलेंच्या ग्रुपवर स्वामी 1 नंबर वर 

परंतु नुकताच सोशल मीडियावर एक सर्वे फिरत आहे. त्यानुसार चौगुले यांची धाकधूक वाढलेली दिसून येतं आहे. मतदारांच्या नाराजीला सामोरे जावे लागेते की, काय असे चित्र आहे.

आमदार चौगुले यांच्याच गटामार्फत काढण्यात आलेल्या poll ग्रुप वर आमदार चौगुले यांना मतदान करून दाखवा असे आवाहन करण्यात आले आहे. परंतु इथे दुसऱ्या टप्प्यातील प्रचारात देखील आमदार ज्ञानराज चौगुले दुसऱ्या क्रमांकावर आहेत आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना उमेदवार प्रवीण स्वामी यांना प्रथम क्रमांकाची पसंदी मतदारानी दिल्याचे स्पष्ट दुसून येते इथे सत्यताची पडताळणी करावी असे कांही नसून  त्यांच्याच poll वॉलवर स्पष्टपणे पाहता येत आहे म्हणून दुसऱ्या टप्यात देखील लोकांच्या मनात चौगुले यांच्याबद्दल चीड अजूनही कायम आहे व महाविकास आघाडीचे उद्धव गटाचे उमेदवार  प्रवीण स्वामी गुरुजी लोकांच्या मनात आहेत असेच आहे  असेच सांगता येते आता तिसऱ्या टप्प्यात धनशक्ती की लोकशक्ती कोण बाजी मारणार निकालांतर समजेलच.



थोडे नवीन जरा जुने