वाजले की बरा,राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाचा महिला डान्स उद्विग्न करणारा - मुकुंद किर्दत आम आदमी पार्टी

पुणे- अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे बारा वाजले, हातातोंडांशी आलेला घास हिरावला गेला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली असताना नागपूरच्या अजित पवार राष्ट्रवादीच्या ऑफिसमध्ये मात्र 'वाजले की बारा'चा महिलाडान्स कार्यक्रम उद्विग्न करणारा असून तमाम पीडित शेतकरी कुटुंबाची चेष्ठा असल्याचे आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत यांनी म्हंटले आहे.

नागपूरच्या गणेश पेठ परिसरातील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या  कार्यालयामध्ये आयोजित दिवाळी मिलन कार्यक्रमात लोकप्रिय लावणी सादर केल्याचा व्हिडिओ  सर्वत्र सोशल मीडिया वर व्हायरल झाला आहे. 

त्यावर टीका होत असून हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम होता असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांनी दिले आसले तरी नागरिकात वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.

आम आदमी पार्टीने यावर कडवट प्रतिक्रिया दिली आहे.

'अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या पक्षाचा ब्रँड आणि स्वतःची प्रतिमा सुधारण्यासाठी गुलाबी रंगाचा वापर सुरू केला. हे करत असताना त्यांच्या मधला पुरुषी अहंकार, टगेगिरी, अरेरावीपणा कमी होईल असे अपेक्षित होते. 

त्याच धर्तीवरती लाडकी बहीण योजना राबवली जात असताना खरोखर महिलांचे सक्षमीकरण आणि सन्मान वाढणे अपेक्षित होते. 

दुसरीकडे विदर्भामध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे खरोखर बारा वाजले आहेत अशा वेळेस या पद्धतीचे समारंभ हे सर्वांना उद्विग्न करणारेच आहेत' 

प्रत्यक्षात त्यांचे कार्यकर्ते तसेच इतर प्रस्थापित पक्षांचे स्थानिक नेते कार्यकर्ते सुद्धा दहीहंडी सारख्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये महिलांनाच नाचवताना दिसत होते. त्यामुळे पक्षाच्या धोरणांमध्ये हा अनैतिक ढिसाळपणा, सवंग पुरुषी, सत्तेचा माज असल्याचा परिणाम आज नागपूर गणेशपेठ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात दिसून आला. 

या प्रस्थापित पक्षांनी स्वतःसाठी काही आचारसंहिता लागू करून घेण्याची गरज आसुन स्त्री सन्मानासंदर्भात कान उघडणी करण्याची गरज आहे.

यावर किमान राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सजग महिला निषेध नोंदवतील अशी अपेक्षा आहे असे मुकुंद किर्दत, प्रवक्ता,आम आदमी पार्टी महाराष्ट्र यांनी म्हटले आहे.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post