पुणे – जैन मंदिर व जैन समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सुविधा देणारे HND होस्टेल आपल्या लाडक्या बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या दलालांच्या विरोधात आज भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.
हे आंदोलन मा. अरविंद भाऊ शिंदे, अध्यक्ष – पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि मा. प्रशांत दादा जगताप, अध्यक्ष – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्रजी पवार गट) यांच्या अध्यक्षतेखाली धर्मदाय आयुक्त कार्यालय, ढोले पाटील रोड, पुणे येथे पार पडले.
या आंदोलनात दोन्ही पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच असंख्य जैन बांधव आणि पुणेकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. या वेळी आंदोलनकर्त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध नोंदवत, जैन समाजाच्या हितासाठी न्याय मिळेपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला.

