पुणे शहर महिला काँग्रेस कमिटी हडपसर विधानसभा महिला काँग्रेसच्या वतीने रविवार दि.१७ जाने रोजी मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदीकुंकु,वाण वाटपाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला
कार्यक्रमाचे आयोजन हडपसर विधानसभा महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा माया ताई संजय डुरे यांनी केले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौ मायाताई
डुरे तर प्रमुख पाहुणे म्हणुन पुणे शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सौ. सोनाली ताई मारणे, पुणे शहर महिला काँग्रेस सरचिटणीस रझिया बल्लारी, कांचन बालनायक,उपस्थित होत्या.
यावेळी हडपसर विधानसभा अंतर्गत महिला पदाधिकारी निवड करण्यात आली.
हडपसर महिला काँग्रेसच्या उपाध्यक्ष पदी मा.ग्रामपंचायत सदस्या जयश्री राऊत, प्रभाग क्र. २७ अध्यक्षा पदी सुनिता कांबळे, उपाध्यक्ष पदी सविता मिटकरी, सरचिटणीस पदी अन्नपूर्णा हालगे, केशवनगर विभाग अध्यक्ष पदी गौरी भंडारी, उपाध्यक्ष पदी अनिता माळी, प्रभाग २२ च्या अध्यक्ष पदी संगिता चव्हाण यांना नियुक्तीपत्र देऊन त्यांच्या भागांतील जबाबदारी सोपविण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हडपसर विधानसभा काँग्रेसचे सरचिटनीस मा.श्री देवदास द. लोणकर, सूत्रसंचालन सोहेल लांडगे यांनी केले.