महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचा शहीद जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात.

स्टार महाराष्ट्र नवक्रांती - रोखठोक,निर्भीड,निरपेक्ष वार्तांकन बतमीसाठी संपर्क मो.९४२१३५५०११

पुणे: महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघाचा भारत चीन सीमेवर शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात. ५८५०० चा डीडी
सबेरिया हेड क्वार्टरचे कर्नल -ए- साहब , मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र एवं गोवा राज्य सब एरिया , घोरपडे पेठ , पुणे यांच्याकडे केला सुपूर्द.

लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत आणि चीनी सैन्यादरम्यान जे काही झाले, ते एखाद्या छोट्या युद्धापेक्षा कमी नव्हते.
या संघर्षाची सुरुवात चीनकडून झाली असली तरी या संघर्षात भारताचे २० जवान शहीद झाले.
भरतभूमीच्या रक्षणासाठी ज्या सैनिकांचा जिव बलिदान झाला या शूर भारतीय सैनिकांच्या कुटुंबासाठी आर्थिक सहाय्यता निधी देण्यासंदर्भात विचार करून महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी शिक्षक व शिक्षकेतर महासंघ पुणे जिल्हा शाखेने देशप्रेमापोटी सबेरिया हेड क्वार्टरचे कर्नल-ए- साहब, मुख्यालय दक्षिण महाराष्ट्र एवं गोवा राज्य सब एरिया, घोरपडे पेठ, पुणे यांच्याकडे ५८,५०० चा डीडी सुपूर्द केला.

या प्रसंगी शिक्षक महासंघ पुणे शाखेचे अध्यक्ष नारायण शिंदे, जितेंद्र पायगुडे- सचिव, विकास थिटे- राज्यसहसचिव, अतुल यादव- राज्य प्रतिनिधी, तसेच पुणे शाखेचे सल्लागार संजय घोडके उपस्थित होते.

शिक्षकांचे हे काम राष्ट्रीय प्रेम, व्यक्त करणारे आहे.सैनिकांसाठी मेणबत्ती, किंवा श्रधानजली अर्पण करून वाहण्यापेक्षा हा उपक्रम प्रेरणादायी असल्याचे मत "मेजर ए- साहब यांनी व्यक्त करून,असेच शिक्षकाकडून देशप्रेमी विद्यार्थी घडवले जावो व आपल्या हातून सामाजिक, व देशकार्य घडो अशी सदिच्छा मेजर ए साहब यांनी व्यक्त केली.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items