आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते,नोबल हॉस्पिटल येथे कोविड-१९ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ


हडपसर दि.१८ जाने- येथील नोबल हॉस्पिटल मध्ये दि.१७ जानेवारी रोजी आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक जगातील सर्वात मोठ्या लसीकरण मोहिमेस आजपासून सुरुवात झाली. 
हडपसर मतदारसंघातील नोबल हॉस्पिटल येथे लसीकरण लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात वैद्यकीय सेवा देणारे सेवक, कर्मचारी वर्गाला लस देण्यात आले आहे.


यावेळी बोलताना आमदार तुपे "म्हणाले पुणेकरांसह समस्त भारतीयांच्या अभिमानाचा केंद्रबिंदू असलेली सीरम इन्स्टिट्यूट सारखी संस्था ज्या हडपसर भागात आहे त्याचा मी प्रतिनिधी आहे याचा मला अतिशय अभिमान आहे असे सांगितले.

सदर शुभारंभप्रसंगी मगरपट्टा सिटी संचालक श्री. सतीश दादा मगर, मा.उपमहापौर श्री.निलेश दादा मगर, नोबल हॉस्पिटल चे डॉ. दिलीप माने, नगरसेविका सौ.वैशालीताई बनकर, पुजाताई कोद्रे, हेमलताताई मगर, नंदाताई लोणकर, उज्वलाताई जंगले, प्राचीताई आल्हाट, नगरसेवक बंडुतात्या गायकवाड,गणेश आबा ढोरे, मारुती आबा तुपे, प्रमोद नाना भानगिरे, स्विकृत सदस्य अविनाश काळे, मनोज घुले, सुनील दादा बनकर, सहाय्यक आयुक्त श्री. राजेश बनकर डॉ. शंतनु जगदाळे तसेच हॉस्पिटल, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने