मुरूम/प्रतिनिधी
मुस्लिम समाजात पवित्र पवित्र मानली जाणारी रमजानची सुरुवात दि. 2 रविवारी पासून सुरवात झाली. त्यानिमित्ताने मुरूम उमरगा ता येथे सांयकाळी नमाज अदा नंतर डॉ झाकिर हुसेन उर्दू हायस्कुलच्या मैदानावर शहरातील मुस्लिम बांधव एकत्र येवून अन्न व पाणी घेऊन उपवास सोडले.
पत्रकार झाकीर बागवान यांनी रमजानच्या पहिल्या दिवशी इपत्यार पार्टीचे आयोजन करून यनिमित्ताने हिंदू व मुस्लिम बांधव यांच्या साठी एकत्र आयोजन केले होते.
यावेळी मोठया संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित राहून रमजानच्या पहिल्या दिवसाच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या.
या हिंदु मुस्लिम एकता आयोजित इपत्यार पार्टीला विधिज्ञ राजसाहेब पाटील,भाजपा नेते राजू मिनियार,शेखर पाटील,सलीम अत्तार, सलीम बागवान ,बाबा कुरेशी, संतोष ढंगे,नेताजी बेंडकाळे,पत्रकार महेश निंबरगे, रफिक पटेल,रवी आंबूसे,झाकीर बागवान, झाकीर जमादार,यांच्यासह हिंदू मुस्लिम समाजातील नागरिक उपस्थित होते