पुणे : सामाजिक बांधिलकी जपत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट), हडपसर विधानसभा मतदारसंघाचे कार्याध्यक्ष श्री. हेमंत (काका) दत्तात्रय बधे यांनी आपला वाढदिवस एक आगळ्या-वेगळ्या पद्धतीने साजरा केला.
अयोध्या चॅरिटेबल ट्रस्ट च्या १०० ते १२० मुखबधिर व कर्णबधिर मुलांसोबत त्यांनी आपला वाढदिवस साजरा करत आनंदाचे क्षण व्यतीत केले. यावेळी तेथील मुलांच्या चेहऱ्यावरील निरागस हास्य आणि निस्वार्थ प्रेम पाहून मनाला समाधान लाभले, अशी भावना श्री. बधे यांनी व्यक्त केली.