🌿 रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद 🌿 कै. रामदास (आण्णा) बधे प्रतिष्ठान चा समाजोपयोगी उपक्रम


पुणे/कोंढवा- मल्लीनाथ गुरवे – 

कै. रामदास (आण्णा) बधे प्रतिष्ठानतर्फे दिनांक १० ऑक्टोबर २०२५ रोजी कोंढवा–येवलेवाडी प्रभाग क्र. ४० येथे सामाजिक कार्यकर्ते व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार पक्ष) हडपसर विधानसभा मतदारसंघाचे कार्यक्षम कार्याध्यक्ष मा. श्री. हेमंत (काका) दत्तात्रय बधे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.

आज विज्ञानाच्या जोरावर नवनवीन शोध लागत आहेत. मानवी जीवन सुखकर होत आहे. सागर समुद्राच्या कुशीत वास्तव्य करतोय. अवकाशातील  चंद्र मालिकेच्या प्रष्ठ भागावर वास्तव्य करण्याच्या तयारी केली जातेय परंतु वेळप्रसंगी जेंव्हा घातपात-अपघात घडला जातो, विविध आजरांनी मृत्युंशी झुंज देत असता शारीरिक शास्त्रक्रिया  ला पर्याय नसतो जिव राहतो की,जातो आशा अवस्थेत  जिव वाचवण्यासाठी लागणारे रक्त मात्र अद्याप जगातल्या कुठल्याच प्रयोग शाळेत किंवा कारखान्यात बनविले जात नाही. तर तें बनते तुमच्या आमच्या माणुकीच्या सहकार्यातून. आणि हेमंत काका बधे यांच्या सारख्या असंख्य कार्यकर्त्यांनी मिळवलेल्या रक्तदान शिबिरातून. थेंब थेंब जमवलेल्या पाऊच मधून. शक्य होतं आहे.

म्हणुन प्रत्येकांनी कधीही कुठेही आणि केंव्हाही आपल्या जीवनात आवश्यक रक्तदान करावे. 

पुण्यातील कोंढवा येवलेवाडी खडीमशीन आशा या भागात  मानवतावादी रक्तदान शिबीर कार्यक्रमाचे उद्घाटन झाले ते पुण्यनगरीचे माजी महापौर व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार पक्ष) चे शहराध्यक्ष मा. श्री. प्रशांत (दादा) जगताप यांच्या शुभहस्ते. 

बधे परिवार आणि राष्ट्रवादी कार्यकर्ते च्या वतीने यावेळी प्रशांत दादा जगताप यांचा सत्कार करण्यात आला. प्रशांत दादा जगताप यांनी केक भरवून हेमंत काका यांना वाढदिवसाच्या राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.


हा कार्यक्रम हेमंत (काका) बधे जनसंपर्क कार्यालय, कै. रामदास (आण्णा) बधे चौक, बधेनगर, कोंढवा बुद्रूक येथे उत्साहात संम्पन्न झाला. या प्रसंगी विविध मान्यवरांनी रक्तदान शिबिरात उपस्थित राहून कार्यक्रमाचे कौतुक आणि हेमंत काका बधे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. प्रत्येक रक्तदात्यास आकर्षक भेटवस्तू सह मानवाला जीवन प्रवाह अर्थात प्राणवायू मिळवून देणाऱ्या नैसर्गिक तुळशीचे रोप भेट देवून निसर्ग पर्यावरण जपण्याचा दुहेरी संदेश दिला गेला.

या उपक्रमाबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले व प्रतिष्ठानच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.

अल्पवधीत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात विविध सामाजिक उपक्रमातून नाव कमवलेले हेमंत काका यांनी त्यांना भेटावयास आलेल्या प्रत्येकाचे मनोभावे आभार व्यक्त करत वाढदिवसाच्या शुभेच्छा रुपी प्रेमाचा स्वीकार करत आभार व्यक्त केले.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post