पुणे : आज दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी काळेपडळ पोलिसांनी उंड्री वॉटर एज सोसायटी मागील परिसरात अवैध हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या इसमाविरुद्ध कारवाई केली.
प्राप्त माहितीनुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी छापा टाकले असता, हनुमंत मलकाजी मॅकलवाड (वय ५२, रा. होले वस्ती) हा इसम हातभट्टी दारू विक्री करताना आढळल्याने त्याला ताब्यात घेतले आहे.अशी माहिती पोलीस प्रशासनाकडून मिळाली.
सदर ठिकाणी अतिक्रमण करून बांधण्यात आलेले शेड उध्वस्त करण्यात आले असून आरोपीस पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणी काळेपडळ पोलिस स्टेशनमध्ये पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे.