पुणे, दि. २ ऑक्टोबर २०२५ धम्मपरिवर्तन शुभ दिनी सम्राट अशोक बुद्ध विहार साईनगर कोंढवा पुणे येथे सम्राट अशोक विजयादशमी व धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात व आनंदमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय बौद्ध महासभेची शाखा स्थापन करून नाम फलकाचे अनावरण ही करण्यात आले.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या कार्यकारिणीची निवड करण्यात आली,त्या निवडी मध्ये —
अध्यक्ष: शरणाप्पा तळेकरउ उपाध्यक्ष: नानासाहेब भारुड, अनंत सरोदे, सरचिटणीस: रामचंद्र भालेरावकार्याध्यक्ष: मरीबा गायकवाड, सहायक कोषाध्यक्ष: बाळासाहेब पालखे, उपाध्यक्ष (प्रसार व पर्यटन): दत्तू हजारे, सचिव (प्रसार व पर्यटन): नितीन वानखेडे, उपाध्यक्ष (संरक्षण): राम आखाडे, सचिव (संरक्षण): दुर्गेश साबळे, हिशोब तपासणी: डॉ.शिरुमाल शेंडे
कार्यक्रमास श्रीकांत कांबळे, गंगाराम नडगिरी, विजय थोरात, काळूराम रणपिसे, रमेश गरड, लहू लोंढे, राजेश शिंदे, सोनवणे, यश लगाडे, मुकेश प्रधान, सुभाष कांबळे, सागर कांबळे, रोहिदास कांबळे उपस्थित होते.
उपस्थितांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सम्राट अशोक व तथागत बुद्ध यांच्या विचारांना अनुसरून समाजउन्नतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.
शेवटी सामूहिक धम्मपालन गाथा घेवून कार्यकमाची सांगता झाली.