पाटेल याच्यावर पुणे शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण १३ गुन्हे नोंद असून, त्याच्यावर पूर्वीही प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती. मात्र, त्यानंतरदेखील त्याने गंभीर गुन्ह्यांचे सत्र सुरूच ठेवले. परिसरात दहशत निर्माण करून लोकांना दुखापत करणे, प्राणघातक शस्त्रांचा वापर करणे, दंगा, आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करणे असे गुन्हे तो करत असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले.
ही कारवाई पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार, सह आयुक्त श्री. रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त श्री. मनोज पाटील, उप आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, आणि सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. घन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
या मोहिमेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) नवनाथ जगताप, पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख यांच्या नेतृत्वाखाली पीएसआय स्नेहल जाधव, सहाय्यक फौजदार शेखर कोळी, हवालदार घाटगे, चव्हाण, कोकाटे, आत्तार, व एकोर्गे यांनी मिळून तपास करून गुन्हेगाराविरुद्ध आवश्यक पुरावे गोळा केले.
गोळा झालेल्या पुराव्यांच्या आधारे सादर करण्यात आलेला प्रस्ताव मा. पोलीस आयुक्त, पुणे शहर यांनी मान्य केला असून आदेश क्र. पीसीबी/डीईटी/७७३/२०२५ व ७७४/२०२५ नुसार वसीम सलीम पटेल यास छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात १ वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे.
या कारवाईमुळे कोंढवा परिसरातील नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेबद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.