पुण्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या TET निकालाबाबत चर्चासत्राचे आयोजन


पुणे दि.20,प्रतिनिधी - महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ, पुणे जिल्हा शाखेच्या वतीने नुकताच मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या TET निकालाबाबत चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
या महत्वपूर्ण TET संदर्भात चर्चा सत्र कार्यक्रमाचे आयोजन गुजराथी शाळा, पुणे येथे केलेले होते. या प्रसंगी अभ्यासू व मुंबई उच्च न्यायालयाचे वकील, ॲड. श्री. राहुल कदम यांनी उपस्थित सर्व शिक्षकांना माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल पत्राचे वाचन व समजावून सांगत ते TET बाबत मा. उच्च व सर्वोच्च न्यायालयांच्या निकालातील निरीक्षणे समजावून सांगितली. 

यावेळी उपस्थित सर्व शिक्षकांनी टीईटी बाबतचे प्रश्न आणि शंका विचारल्या आणि त्यावर कदम साहेबांनी सखोल मार्गदर्शन करीत उपस्थित केलेल्या प्रश्नांना सविस्तर समाधानकारक उत्तरे  दिली. 

याप्रसंगी व्यासपीठावर महासंघाचे पुणे जिल्हा अध्यक्ष श्री. नारायण शिंदे, जिल्हा सचिव श्री जितेंद्र पायगुडे, राज्य उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर गायकवाड, राज्य सहसचिव श्री. विकास थिटे, पुणे शहराध्यक्ष श्री. संदीप सातपुते, महिलाध्यक्षा सौ. रसिका परब, शहर सचिव सौ. रूपाली आवाड उपस्थित होते. तसेच महासंघ जिल्हा उपाध्यक्ष श्री. दिपक भोसले सर, मावळ तालुकाध्यक्ष श्री. आनंद गावडे सर व इतर पदाधिकारी व महासंघाचे सन्माननीय पदाधिकारी व सभासद यांचीही उपस्थिती लाभली. 



Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post