प्रतिनिधी.
मुरूम ता.उमरगा येथे मराठावढा मुक्ती संग्राम दिनानिमित्त येथील जि प स्पेशल प्राथमिक शाळेतशहीद हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी प्रतिमा पुजन सिद्धेश्वर भालेराव यांच्या हस्ते झाले. शाळेच्या मुख्याध्यापिका प्रमिला तुपेरे यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले.
शाळेतील मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणुन फाउंडेशनच्या वतीने शाळेला वाटर फिल्टर देण्यात आले. शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार लिमये यांनी विद्यार्थ्यांना फिल्टर बटन दाबून शुद्ध पाणी विद्यार्थ्यांना दिले. प्रा.नागनाथ बनसोडे यांच्या मातोश्रीचे द्वितीय पुण्यस्मरणार्थ विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
आँनलाईन बदलीने रुजू झालेले अंगद थिटे व आशालता शिवकर यांचं स्वागत करण्यात आले. सिध्देश्वर भालेराव यांनी फिल्टर चालू करण्यासाठी आवश्यक दुरुस्ती व साहित्य पुरविले त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष निर्मलकुमार लिमये व उपाध्यक्ष सुरज कांबळे, चंद्रकांत गोडबोले, राहुल गायकवाड, नागनाथ बनसोडे,अमोल गोडबोले, रेश्मा मुरुमकर, स्नेहल गोडबोले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपचंद ख्याडे व आभार शिवाजी गायकवाड यांनी मानले.