"भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला आम आदमी पार्टीचा तीव्र विरोध – पुण्यात पाकिस्तानी टी-शर्ट जाळून केला निषेध"


पुणे - रविवार दि., 14 सप्टेंबर 2025 रोजी दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर होणाऱ्या एशिया कप क्रिकेट सामन्यात भारत आणि पाकिस्तान आमने सामने येणार आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी जम्मू काश्मीरमधील पहलगाम घाटीत पाकिस्तानी दहशतवाद्यांनी २६ निष्पाप नागरिकांची निर्घृण हत्या केल्यानंतर या सामन्यावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत.    
"आता क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यापेक्षा देशातील जनभावना आणि राजकीय वादविवाद जास्त तापले आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा फक्त खेळ नाही, तर तो अनेक वेळा राष्ट्रहित आणि जनभावनांशी जोडला जातो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे." 
पाकिस्तान सोबत क्रिकेट ही देश भक्तीची थट्टा,असून देश भक्तीचा व्यपार सुरु असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे. तर भाजपा चे पाकिस्थान सोबत मॅच खेळणे म्हणजे दाल मे कुछ कला है अशी शंका आणि प्रतिक्रिया एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे. दहशतवादी पाकिस्तानसोबत क्रिकेट हा शहिदांचा अपमान असल्याचे आपने म्हंटले आहे.
वा खासदार संजय राऊत यांनी "खरे देश भक्त ही मॅच पाहणार नाहीते असे माध्यमांशी बोलताना सांगतिले.

"आता क्रिकेटच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यापेक्षा देशातील जनभावना आणि राजकीय वादविवाद जास्त तापले आहेत. भारत-पाकिस्तान क्रिकेट सामना हा फक्त खेळ नाही, तर तो अनेक वेळा राष्ट्रहित आणि जनभावनांशी जोडला जातो, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे." 

या पार्श्वभूमीवर आम आदमी पार्टीने या सामन्याला विरोध दर्शवत त्याला 'शहिदांचा अपमान' असे संबोधले आहे. पक्षातर्फे पुण्यातील शिवाजीनगर मेट्रो चौकात पाकिस्तानी क्रिकेट संघाचा टी-शर्ट जाळून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला.

या वेळी आम आदमी पार्टीचे कार्याध्यक्ष अजित फाटके पाटील म्हणाले, "ज्या देशाने भारतीय महिलांचे कुंकू पुसले, अशा दहशतवादी देशासोबत क्रिकेट खेळणे ही मोदी सरकारची कोणती मजबुरी आहे? आर्थिक हितसंबंधांसाठी देशप्रेमाला तिलांजली देणे आम्हाला मान्य नाही." आशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

या निषेध आंदोलनात मुकुंद किर्दत, सुदर्शन जगदाळे, अभिजीत मोरे, सुरेखा भोसले, अनिकेत शिंदे, सुभाष कारंडे, रवीराज काळे, शितल कांडगावकर, प्रशांत कांबळे, रितेश निकाळजे, सुरेश भिसे, वैभव टेमकर, संग्राम पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.



Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post