जेवळी ता.लोहारा येथील लिंगायत स्मशानभूमी संदर्भात उपोषण स्थगित, पण न्यायालयीन लढा सुरुच राहील. आमदार स्वामी यांची मध्यस्थी

दि २१ऑगस्ट २०२५

जेवळी ता. लोहारा जि.धाराशिव लिंगायत स्मशानभूमीवरील वृक्षारोपण आणि म्हाडाला देण्यात आलेल्या जमिनीच्या प्रश्नावर गेले २२ दिवस सुरू असलेले उपोषण स्थगित करण्यात आले.

काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्यामसुंदर तोरकडे साहेब यांनी समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी हा उपोषण लढा सुरु केले होते.वयोमानानुसार त्यांची तब्येत खालावल्यामुळे त्यांना उपजिल्हा रुग्णालय, धाराशिव येथे दाखल करण्यात आले.

दि 21 आगस्ट रोजी लोहारा उमरगा आमदार प्रवीण स्वामी यांनी रुग्णालयात भेट देऊन, तोरकडे साहेबांना त्यांच्या जन्मदिनाच्या औचित्याने व आरोग्याचा विचार करून उपोषण सोडण्या संदर्भात चर्चा केली त्यामुळे

आमदार साहेबांच्या विनंतीला मान देत, तोरकडे यांनी उपोषण मागे घेतले.*

यावेळी उपोषण कर्ते *तोरकडे यांनी स्पष्ट केले की, वयोमानानुसार प्रकृती साथ देत नाही. म्हणुन अनेकांनी उपोषण स्थगित करण्याचा सल्ला देत आहे.पण न्यायालयीन लढा सुरू राहील आणि या लढ्यात आमदार प्रवीण स्वामी ठामपणे सोबत उभे आहेत. त्यामुळे हा प्रश्न लवकरच मार्गी लागेल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी , काँग्रेस प्रदेश संघटक डॉ. सुनिता शहापूरकर,काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, जिल्हा संघटक शेरखाने साहेब, माजी जिल्हाध्यक्ष उमेश निंबाळकर, उमरगा तालुकाध्यक्ष अर्जुन बिराजदार,

महाराष्ट्र सांस्कृतिक विभाग सेल सय्यद खलील सर, जिल्हा सरचिटणीस विजय वाघमारे, शहराध्यक्ष अग्नीवेश शिंदे,  एस.पी. ईनामदार, अमित रेड्डी, कल्लेश्वर टिंकबरे उपस्थित होते...

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने