वृक्ष केवळ ऑक्सिजनच नाही, तर निसर्गाचा एक भाग आहेत आणि त्यांची काळजी घेणे आपल्या कर्तव्यात समाविष्ट आहे.


पुणे कोंढवा दि.31,प्रतिनिधी-

वृक्ष केवळ ऑक्सिजनच नाही, तर निसर्गाचा एक भाग आहेत आणि त्यांची काळजी घेणे आपल्या सर्वांच्या कर्तव्यात समाविष्ट आहे. याची जाणीव करून देणारा,

 "एक पेड माँ के नाम" या सरकारी अभियान अंतर्गत  आयोजित कार्यक्रम श्री शिवछत्रपती प्राथमिक विद्यालय साईनगर कोंढवा बु. पुणे यांचा वृक्षारोपण कार्यक्रम खूपच प्रेरणादायक ठरला. हिरवा शालू नेसून नटलेल्या खडीमशीन कोंढवा - सासवड मार्गांवरील येवलेवाडी च्या डोंगरावर शाळेचे विद्यार्थ्यां शिक्षक आणि पालक सर्वांनी सक्रियपणे सहभाग घेवुन साधारण 200 देशी झाडांची लागवड यावेळी केली. यामध्ये आंबा, चिंच, कडूनिंब, पिंपळ, वड, जांभूळ यासारखी महत्त्वाची झाडे लावण्यात आली. 


या वृक्षारोपणाच्या उपक्रमाला शाळेच्या संस्थापक अध्यक्ष सन्माननीय रमेशजी गायकवाड साहेब, मुख्याध्यापिका सौ. शोभा खाटपे मॅडम आणि इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष मा.रमेशजी गायकवाड यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व यावेळी विषद करताना, झाडांच्या देखभालीला किती महत्त्व आहे हे पटवून देत प्रत्येकाने किमान एक तरी झाडं लावले पाहिजे असे सांगून शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे कौतुक करत सर्वांचे आभार मानले. 


या कार्यक्रमाच्या निमित्ताने अशा प्रकारे एकत्र येऊन झाडांची लागवड करून निसर्गाच्या साक्षात्कारा सोबतच एक सकारात्मक असा संदेशही दिला गेला की, "झाडं आपले जीवन केवळ शुद्ध करत नाहीत, तर पर्यावरणाचा समतोल  साधण्यासाठी देखील महत्त्वाची भूमिका बजावतात" हे अधोरांकित केले.

यावेळी या उपक्रमासाठी श्री गोरख भाऊ दिवेकर, श्री कैलास बापू कामठे पाटील, श्री अनिल देवकाते आणि श्री विष्णू देवगिरीकर यांचे विशेष सहकार्य मिळाले.

आपल्या पुढील पिढीला पर्यावरणाबद्दल जागरूक करणारा आणि निसर्गाच्या प्रेमाचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच मोठ्या प्रमाणावर प्रेरणादायक ठरला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने