गुंजोटी/प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील गुंजोटी येथे समर्पण सामाजिक बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने चालवण्यात येणाऱ्या डी. के. इंग्लिश स्कूलच्या वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कलादर्शन सादर करीत शनिवार (दि. ०१ मार्च रोजी विद्यार्थ्यांनीं गावाकऱ्यांचे केले मनोरंजन आणि प्रबोधन.
स्नेहसंमेलनात विविध गीतावर नृत्य सादर केले. सामाजिक नाटिका सादर करत समाज प्रबोधन केले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या सचिव क्रांती व्हटकर होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून शीतल दूधभाते यांची उपस्थिती होती.
यावेळी मधुरा दूधभाते, श्रेयश दुधभाते, सिद्धार्थ दुधभाते, सानवी सुर्यवंशी,बुशरा शानेदिवाण,सानवी दूधभाते, अर्ष शनेदिवान, शुभम बनसोडे, प्रेम जाधव, तेजस खंडागळे, महमद शेख, महम्मद मणियार, आतिफ जहागीरदार, ईश्वरी शेटगार, आर्या बनसोडे, पद्मजा माने, अजिंक्य घाटे, कृष्णा सुर्यवंशी, बुशरा शानेदिवाण, वैभवी दूधभाते, अनम उमापुरे, श्रेयश मनोज दूधभाते, सहर्ष राघोजी, अलिशबा मुजावर, अनस मुल्ला, या विद्यार्थ्यांनी भक्तीगीत, लोकगीत, कोळीगीत, शेतकरी गीत, कवाली, देशभक्ती गीतावर नृत्य सादर करून चिमुकल्यांनी उपस्थितांची वाहवा मिळवली.
शिवाय नाटिकेतून अंधश्रद्धा , हुंडाबळी , सर्वधर्म समभाव, विविधतेतून एकता, मुलींचे जन्मदर वाढविणे, दारूबंदीचा संदेश सादर केला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यास्मिन मौला, प्रज्ञा गुंजारे, विक्रम व्हटकर, साईराज कटकधोंड, विशाल व्हटकर, शेखर कटकधोंड यांनी पुढाकार घेतला.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यास्मिन मौला यांनी केले तर आभार सहशिक्षिका प्रज्ञा गुंजारे यांनी मानले.