पुणे प्रतिनिधी -
पिंपरी चिंचवड परिसरात दि. २९/०१/२०२५ रोजी वाकड पोलीस ठाण्याचे हदीत पेट्रोलींग करीत असताना ताथवडे सर्व्हिस रोड येथे मयुर लॉजचे जवळ, ताथवडे, पुणे येथे एक इसम त्याचे जवळ बेकायदेशीर पिस्तुल बाळगून आहे अशी बातमी मिळाली असता त्या माहितीच्या आधारे तपास पथकाचे अधिकारी अंमलदार यांचेसह ताथवडे सर्व्हिस रोड येथे मयुर लॉजचे जवळ, ताथवडे, परिसरात सापळा लावून इसम नामे समिर नवाब शेख, वय २७ वर्षे, रा. लक्ष्मीनगर, गव्हाणे हॉस्पीटल शेजारी, थेरगाव, पुणे यास शिताफिने ताब्यात घेतले.
या विषयांचे गांभीर्य लक्षात घेवून त्याची कसून झाडाझडती घेतली. त्याचेकडे बेकायदेशीर देशी बनावटीचे "एक पिस्टल, एक जिवंत काडतुस ” ५२,०००/- रुपये किंमतीचे मिळुन आले.
सदर घटनेबाबत वाकड पोलीस स्टेशन गु. रजि. नं. ४६ / २०२४ भारताचा शस्त्र अधिनियम १९५९ चे कलम ३, २५ महाराष्ट्र पोलीस अधिनियम ३७ (१) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नमूद गुन्ह्यात त्यास अटक करण्यात आली असून अधिक तपास चालू आहे.
नमूद आरोपी समिर नवाब शेख याचेविरुध्द वाकड पोलीस ठाणे येथे १) गु.र.नं. ३९३ / २०१८, भादंवि कलम ४२७,४७२, ५०४, ५०६ (२), १४३, १४४, १४७, १४९, १४९ २) गु.र.नं. १०२८ / २०१८, भादंवि कलम ३२७,३३६,५०६ (२), ३४ ३) गु.र.नं. १४४ / २०१८, भादंवि कलम ४३५, ४३६, ४२७, १४३, १४४ ४) गु.र.नं. ४२८ / २०२०, भादंवि कलम १८८ आर्म अॅक्ट ४, २५ मपोका कलम १४२, ३७ ( १ ) ( ३ ) सह १३७ क्रि. लॉ. अ. अॅ. ३, ७ ७ ) गु.र.नं. २१० / २०२०, मपोका कलम १४२ ६) गु.र.नं. ६१४ / २०२०, मपोका कलम १४२ ७) गु.र.नं. १०० / २०२४, मपोका कलम १४२ ८) गु.र.नं. १५/२०२२, भादंवि कलम ३९५, ३२३ मपोका कलम ३७ (१) (३), सह १३५ आर्म अॅक्ट कलम ४, २५ मोका व गु.र.नं. १८ / २०२२ आर्म अॅक्ट ४,२५ मपोका कलम ३७ (१) ( ३ ) सह १३७ क्रि. लॉ. अ. अ. ३, ७ प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
सदरची उल्लेखनीय कामगिरी मा. श्री. विनय कुमार चौबे सो, पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड, मा. डॉ. शशीकांत महावरकर, पोलीस सह आयुक्त, मा. श्री. वसंत परदेशी, अपर पोलीस आयुक्त, श्री. विशाल गायकवाड सो, पोलीस उप आयुक्त, परि-१, श्री. सुनिल कुराडे, सहा. पोलीस आयुक्त सो, वाकड विभाग यांचे मार्गदर्शनाखली वाकड पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, निवृत्ती कोल्हटकर, सपोनि., सुभाष चव्हाण, पोउपनि अनिरुध्द सावर्डे, श्रेणी पोउपनि विभीषण कन्हेरकर, पोलीस अंमलदार संदिप गवारी, बंदु गिरे, ज्ञानदेव झेंडे, कौतेंय खराडे, सौदागर लामतुरे, तात्यासाहेब शिंदे, नामदेव वडेकर, विजय भुसारे, सचिन गायकवाड, रामचंद्र तळपे, विजय घाडगे, दिपक साबळे यांनी केलेली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि अनिरुध्द सावर्डे हे करीत आहे.