पुणे प्रतिनिधी –
रुग्ण हक्क परिषद पुणे शहर कमिटीच्या आंबेगाव बुद्रुक फालेनगर शाखेचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या शाखेची स्थापना सुरेश भाऊ फाले यांच्या संयोजनातून करण्यात आली. या सोहळ्याला विविध मान्यवर आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उद्घाटन समारंभास रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, नगरसेवक युवराज बेलदरे, माजी नगरसेवक संतोष फरांदे, परिषदेचे राज्य समन्वयक राजाभाऊ कदम, पुणे शहराध्यक्ष अपर्णा मारणे-साठे, तसेच रेश्माताई जांभळे, प्रभाताई अवलेलू आणि राहुल भाऊ हुलावळे आद मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमात रुग्ण हक्क परिषदेच्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. परिषदेच्या कार्याचा उद्देश आणि रुग्णांच्या हक्कांसाठी संघटनेच्या भविष्यातील योजनांवरही चर्चा झाली. आंबेगाव बुद्रुक परिसरातील अनेक सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांनी या उपक्रमाचे स्वागत केले आणि परिषदेस सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
रुग्ण हक्क परिषदेच्या माध्यमातून नागरिकांना वैद्यकीय सेवा आणि उपचार प्रक्रियेत होणाऱ्या गैरप्रकारांविरोधात लढण्यासाठी मदत मिळणार आहे. या शाखेच्या स्थापनेमुळे आंबेगाव बुद्रुक आणि परिसरातील रुग्णांना त्यांच्या हक्कांबद्दल जागरूकता निर्माण होईल आणि आवश्यक मदतही मिळेल, अशी आशा व्यक्त करण्यात आली.