मुरूम/वार्ताहर
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसेच महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत मुरूम शहरातील ग्रामीण रुग्णालय व संभाजी नगर येथील बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना तसेच शहरातील ग्राहक सेवा सुविधा केंद्रात मोफत आयुष्मान कार्ड वाटप अभियान शुक्रवारी सुरू करण्यात आले आहे.
मुरूम ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक एम. एम. अरदाले यांच्या हस्ते लाभार्थ्यांना मोफत आयुष्यमान कार्ड वाटप करून या मोहिमेस प्रारंभ करण्यात आला.
मुरूम शहरात एकूण 8 हजार लाभार्थ्यांचे या योजनेअंतर्गत नोंदणी आहे. मात्र अनेक लाभार्थी आयुष्यमान कार्डला आधार कार्ड व मोबाईल क्रमांक लिंक केले नाहीत त्यामुळे लाभार्थ्यांनी आधार व मोबाईल क्रमांक लिंक करून घ्यावेत आयुष्यमान कार्डच्या आधारे पाच लाखापर्यंत मोफत उपचार मिळू शकते यासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालय व आपला दवाखाना आणि शहरातील ग्राहक सेवा सुविधा केंद्रात याबाबत सेवा सुरू करण्यात आल्या आहेत याचा लाभ नागरिकांनी घ्यावे असे आवाहन वैद्यकीय अधिक्षक अरदाळे यांनी यावेळी केले
◾पांढऱ्या रेशनकार्डधारकांनाही मिळणार योजनेचा लाभ-
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा फुले जन आरोग्य योजनाअंतर्गत यापूर्वी पिवळा व केसरी कार्डधारकांनाच लाभ घेता येत होते आता पांढऱ्याकार्डधारकानाही या योजनेअंतर्गत पाच लाख रुपये पर्यंत मोफत उपचार मिळणार आहे शासनाने तसे आदेश जारी केले आहे असेही अरदाले यांनी सांगितले
कुठे मिळणार मोफत उपचार-
उमरगा तालुक्यात मुरूम व उमरगा येथील शासकीय रुग्णालय तसेच उमरगा शहरातील विश्वेकर हॉस्पिटल,साई हॉस्पिटल, के डी शेंडगे हॉस्पिटलमध्ये, सास्तुर येथील स्पर्श रुग्णालय अशा नजीकच्या ठिकाणी लाभार्थ्यांना मोफत उपचार मिळू शकते
◾आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड , सर्व प्रकारचे रेशन कार्ड व आधार कार्ड लिंक असलेला मोबाईल नंबर नोंद असणे आवश्यक आहे
◾ योजनेत नाव नोंदणी नव्याने समाविष्ट करण्यासाठी लाभार्थ्यांना तहसील विभागातील पुरवठा विभागात आवश्यक सर्व कागदोपत्र अर्जासह दाखल करून नाव नोंदणी करता येते

