मुरूम / वार्ताहर
आलूर येथील पत्रकार हणमंत शंके यांना व्हाट्सएप ग्रुपच्या माध्यमातून अश्लील शिवीगाळ करून धमकी दिल्याप्रकरणी मुरूम पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान गुरुवारी मुरूम शहरातील पत्रकारानी पोलिसात निवेदन देऊन या घटनेचा निषेध व्यक्त केले
आलुर येथील पत्रकार हणमंत शंके यांना गावातीलच एका व्यक्तीने गुलबर्गा येथे राहून मोबाईलच्या व्हाट्सअप ग्रुपवर ऑडिओ मेसेज व रेकॉर्डिंगद्वारे अश्लील शिवीगाळ केली आहे यामध्ये कुटुंबातील महिलांनाही आरोपीना शिवीगाळ केल्याचे दिसून येते.
याबाबत शंके यांनी मुरूम पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यावरून आरोपीविरुद्ध बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान पत्रकाराला धमकी दिल्याने या घटनेचा उमरगा लोहारा पत्रकार महासंघ तसेच मुरूम शहर संघटनेने निषेध व्यक्त केले आहे तसेच शहरातील पत्रकारांनी गुरुवारी सहायक पोलिस निरीक्षक संदीप दहिफळे यांना प्रत्यक्ष भेटून आरोपीविरुद्ध कडक कारवाई करण्यासाठी निवेदन देऊन निषेध व्यक्त केले