पुणे, दिघी दि. ८जाने - (यल्लापा गायकवाड )
आळंदी येथे विविध समाज घटकातील उल्लेखनीय कार्य करऱ्या विविध मान्यवरांचा वेंकटेश बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने विविध पुरस्कार देवून त्यांचा सन्मान करण्यात आला.
समाजात अनेकजण स्वतःचा वेळ समाजकार्यासाठी देत असतात. अशा व्यक्तींचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य ठरते. अशा कारण त्यांना त्यातून खऱ्या अर्थाने समाजकार्य करण्याची ऊर्जा मिळत असते.
याच उद्देशाने व्यकटेश बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने सन्मान सोहळा कार्यकम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला प्रा. रियाज मुल्ला, डॉ. बाळासाहेब विभुते, डॉ. सचिन पेठकर, सौ. कल्पना मासाळ, सरपंच परिषदेचे मा. रेखाताई टापरे इत्यादी मान्यवर उवस्थित होते.
यावेळी अनेक मान्यवरांचा सत्कार विविध पुरस्कार देवून त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थापक अध्यक्ष शिवकुमार देवकाते, यांनी आलेल्या सर्व पाहुणे व मान्यवरांचे आभार व्यक्त केले या कार्यक्रमासाठी हातभार लावणारे कांताजी आखाडे, युवा उद्योजक आबासाहेब देशमुख, प्रकाश खोपडे माधव उत्तलवाड, पंढरीनाथ जायनुरे, अनेक जण उपस्थित होते.