पुणे दि. 9 - आजाद समाज पार्टीच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना समजसेविका फातिमा बी शेख यांचे स्मारक उभे करण्याची मागणी निवेदनद्वारे करण्यात अली असून कोंढवा येथील वेलकम हॉल चौकाचे "अम्मा फातिमा बी शेख चौक" असे नामकरण करण्याची मागणी निवेदन द्वारे करण्यात आली आहे.
समजसेविका अम्मा फातिमा बी शेख या स्त्री शिक्षणाच्या क्षेत्रातील एक अग्रणी व्यक्तिमत्त्व होत्या. त्या माता सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतिबा फुले यांच्यासोबत काम करत होत्या आणि त्यांनी वंचित समाजातील महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान दिलेले आहे.त्यामुळे या चौकाचे नामकरण करण्यात यावे, अशी मागणी आजाद समाज पार्टीच्या वतीने करण्यात अली आहे.
आजाद समाज पार्टीने अम्मा फातिमा बी शेख यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व त्यांच्या कार्याला योग्य तो आदर देण्यासाठी हा प्रस्ताव मांडला आहे. पुणे महानगरपालिका या मागणीची दखल घेईल आणि या ऐतिहासिक स्त्री शिक्षणपुरस्कर्त्या व्यक्तिमत्त्वाचा गौरव करेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.