या दुर्घटनेमुळे संपूर्ण देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. पंतप्रधान, मुख्यमंत्री तसेच विविध मान्यवरांनी या दुर्दैवी घटनेवर शोक व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.
कुंभ मेळा हा धार्मिक श्रद्धेचा महोत्सव असला तरी वारंवार होणाऱ्या अशा दुर्घटनांमुळे सुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. भाविकांच्या सुरक्षेसाठी अधिक काटेकोर व्यवस्था करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली आणि जखमींच्या लवकर स्वास्थ्य लाभाची प्रार्थना!
महाकुंभमेळा ही हिंदू परंपरेतील महत्त्वपूर्ण क्षण घटना आहे. हा महाकुंभमेळा प्रयागराज मध्ये सुरु असून यावेळी अचानक झालेल्या चेंग्राचेंगरीत जवळपास 15 भाविक मृत पावल्याचे आणि अनेकजन जखमी असल्याचे वृत्त आहे. उत्तर प्रदेश सरकार कडून या ठिकाणी युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य सुरू आहेत.
आजच्या या घटनेमुळे जुन्या जखमा पुन्हा ताज्या झाल्या आहेत.
महाकुंभाच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्घटना म्हणून 1954 च्या घटनेचा उल्लेख केला जातो.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच म्हणजे 1954 मध्ये उत्तर प्रदेशात कुंभमेळा आयोजित करण्यात आला होता. 3 फेब्रुवारी 1954 रोजी मौनी अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर, अलाहाबाद (आता प्रयागराज) येथील कुंभमेळ्यात पवित्र स्नान करण्यासाठी जमलेल्या भाविकांमध्ये चेंगराचेंगरी झाली होती.त्यावेळी सुमारे 800 लोक मृत्युमुखी पडले होते. महाकुंभाच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा अपघात होता.
2) 1986 ची घटना त्यात 200 लोकांचा बळी -
1986 मध्ये हरिद्वारमध्ये कुंभमेळा होता. यावेळी चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये डझनभर लोकांचा मृत्यू झाला.14 एप्रिल 1986 रोजी उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री वीर बहादूर सिंह अनेक राज्यांच्या मुख्यमंत्री आणि खासदारांसह हरिद्वारला पोहोचले होते.यामुळे सामान्य लोकांची गर्दी संगमा पर्यंत पोहोचण्यापासून रोखण्यात आली.यामुळे गर्दी नियंत्रणाबाहेर गेली आणि चेंगराचेंगरी झाली. यावेळी मीडिया रिपोर्ट्सनुसार,या अपघातात 200 लोकांचा मृत्यू झाला होता.
3) 2003 मध्ये 39 जणांचा जीव गमवला - 2003 मध्ये नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्यादरम्यान भीषण चेंगराचेंगरी झाली ज्यामध्ये 39 भाविकांना मृत्यू झाला.लाखो लोक उद्ध्वस्त झाले. या कुंभ अपघातात 100 जण जखमी झाले.
2010 मध्ये सात जणांचा मृत्यू - मीडिया रिपोर्टनुसार, 14 एप्रिल 2010 रोजी हरिद्वार कुंभमेळ्यात शाही स्नानादरम्यान साधू आणि भाविकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 7 जणांचा मृत्यू झाला आणि 15 जण जखमी झाले.
2013 मध्ये 42 जणांनी जीव गमवला - नाशिक कुंभमेळ्याच्या 10 वर्षांनंतरम्हणजे 2013 च्या प्रयागराज कुंभमेळ्यात आणखी एक दुर्घटना घडली. अलाहाबादआताचे प्रयागराज रेल्वे स्टेशनवर अपघात झाला.या अपघातात 42 जणांचा मृत्यू झाला. यामध्ये 29 महिला, 12 पुरुष आणि एका आठ वर्षांच्या मुलांचा समावेश होता.आणि 45 जण जखमी झाले होते.
त्यानंतर 2025 मध्ये 15 हून अधिक मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 2013 नंतर, चेंगराचेंगरीची घटना आता 2025 मध्ये घडली आहे. यात 15 जन मृत झाल्याची माहिती येत आहे.
या अपघातानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लोकांना जिथे असाल तिथे आंघोळ करण्याचे आवाहन केले आसुन त्यांनी लिहिले की,तुमच्या जवळ असलेल्या गंगा मातेच्या घाटावर स्नान करा, संगम नाक्याकडे जाण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही सर्वांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि व्यवस्था करण्यात सहकार्य करावे.