275 अभ्यासकांनी दिली भारतीय संविधानावर महापरीक्षा- निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंचचा स्तुत्य उपक्रम


कोल्हापूर: भारतीय संविधान जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि संविधान साक्षरता वाढवण्यासाठी देशभरात विविध उपक्रम राबवले जात आहेत.

या पार्श्वभूमीवर, निर्मिती फिल्म क्लब आणि बालसाहित्य कलामंच यांच्या संयुक्त विद्यमाने "आपला अभिमान – भारतीय संविधान" या संकल्पनेतून भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त भारतीय संविधान जागृती निर्माण व्हावी, या उद्देशाने संविधान महापरीक्षा आयोजित करण्यात आली.

ही महाभव्य महापरीक्षा प्रबुद्ध भारत हायस्कूल, लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर येथे पार पडली. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील तब्बल 275 अभ्यासक आणि संशोधकांनी यात सहभाग घेतला. भारतीय संविधानाच्या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास करून, संविधानावर आधारित परीक्षेत त्यांनी आपली व्युत्पत्ती सिद्ध केली.

संविधान साक्षरता अभियान अंतर्गत घेतलेल्या या परीक्षेतून संविधानविषयी जागरूकता वाढवण्याचा प्रयत्न केला गेला. या उपक्रमाच्या यशस्वीतेनंतर, हा उपक्रम देशभर राबवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

कार्यक्रमास प्रबुद्ध भारत हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार अर्दाळकर, तसेच शंकर पुजारी, अनिल म्हमाने, ॲड. करुणा विमल, विश्वासराव तरटे, नीती उराडे, अंतिमा कोल्हापूरकर, अर्हंत मिणचेकर, ॲड. राम धुमाळ, अनुजा कांबळे, सुंदर कांबळे, हंबीरराव तरटे, शर्वरी पाटोळे, ऋषिकेश कोळगे, सागर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

या महापरीक्षेच्या आयोजनामुळे संविधान वाचनाची आणि त्यावरील चिंतनाची नवी परंपरा निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने