मुरूम/प्रतिनिधी-
मुरूम ता उमरगा येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील मुलींना युवासेनेच्या वतीने बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त सात सायकलीचे मोफत वाटप करण्यात आले . शहरापासून सात ते दहा किलो मिटर दुरवरून शिक्षणासाठी मुली मुरूम शहरात रोज ये जा करीत असतात.
मार्गांवरील बसेस कधी वेळेवर मिळतात तर कधी चार चार तास वाट पहात बसावे लागते. त्यामुळे त्यांच्या येण्या जाण्याची सोय व्हावी म्हणून युवा सेनेच्या या पुढाकारामुळे नक्कीच त्यांची सोय होनार असल्याने लाभार्थी मुलींच्या चेहऱ्यावर आंनद दिसून येत होता.
माजी खासदार रविंद्र गायकवाड तसेच शिवसेना उपनेते व माजी आमदार ज्ञानराज चौगुले, मराठवाडा युवासेना पक्ष निरीक्षक किरण गायकवाड यांच्या आदेशानुसार हा उपक्रम राबवल्याचे युवासेना उपजिल्हा प्रमुख भगत माळी यांनी सांगितले
आयोजित कार्यक्रमला शिवसेना उपतालुका प्रमुख राजेंद्र शिंदे, दत्ता हूळमजगे, प्रसाद मुडकन्ना, संदीप बाबळसुरे, वैभव इंगळे, प्रतिक राठोड,bविठ्ठल चौधरी, प्रशांत राठोड, शाळा मुख्याध्यापक श्रीमती कांबळे, सहशिक्षिका जाधव उपस्थित होते