मरूम शहरात मोकळ्या मैदानावर आढळून आला 25,वर्षीय तरुणाचा मृत देह, मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट

 

मुरुम /वार्ताहर

मुरूम शहरात 25 वर्षीय तरुणाचा मृतदेह नगरपालिकेच्या मैदानावर रात्रीपासून पडून असल्याचे गुरुवारी सकाळी निर्देशनास आले आहे. सतिश मारुती वडतीले राहणार गांधी चौक मुरूम असे मयताचे नाव आहे.ते पाहण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात पाहण्यासाठी गर्दी करताना दिसत होते.


सविस्तर माहिती अशी की, मुरूम शहरात दि. 23 रोजी गुरुवारी सकाळी १० च्या सुमारास नगरपरिषद च्या मैदानावर एका तरुणाचा मृतदेह पडले आल्याची माहिती मुरूम पोलीस विभागाला मिळाली.

 त्या माहिती नुसार बिट अंमलदार साकळे व पोलिस कर्मचारी राठोड हे घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठववले. या प्ररकणी मुरूम पोलिसात या घटनेची नोंद घेण्यात आली आहे.

दरम्यान घटनास्थळच्या परिसरात अवैद्य दारू विक्रीचे अड्डे आस्तित्वात असल्याची माहिती सांगण्यात येत असून मयत सतिश वडतीले हा बुधवारी रात्री दारू पिण्यासाठी तिथे आला असावा.थंडीमध्ये नशेत रात्रीच मैदानात झोपला असेल अशी चर्चा असली तरी नेमका त्याचा मृत्यू नैसर्गिक झाला की, दारूमुळे झाला ?   की, त्यामागे कांही घातपात आहे. हे शवविच्छेदनाच्या अहवाल समोर आल्यानंतरच स्पष्ट होईल.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने