आमदार राणा जागजीतसिंह पाटील व सिम्बॉसियस यांच्यात बैठक पार पडली
पुणे - प्रतिनिधी -
पुणे येथील सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यापीठाच्या सहकार्याने तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आसून या पुढील काळात येथे जावा सारखे महत्वपूर्ण आणि अल्पमुदतीचे, रोजगार भिमुख कौशल्य विकास अभ्यासक्रम राबवले जाणार आहेत. हे अभ्यासक्रम तुळजाभवानी अभियांत्रिकी महाविद्यालयात सुरू केले जाणार आहेत. त्यामुळे या भागात विद्यार्थयांची शिक्षणाची सोय आणि विकासाला चालना मीळेल.
तुळजापूर येथे कौशल्य विद्यापीठ स्थापन करण्याच्या अनुषंगाने पुणे येथील जगप्रसिद्ध सिम्बायोसिस कौशल्य आणि व्यवसायिक विद्यापीठाचा नुकताच दौरा केला असून लवकरच कामाला सुरवात होणार आहे.
सिम्बायोसिसचे अनुभवी आणि तज्ञांचे पथक धाराशिव जिल्ह्यातील एकूण भौगोलिक परिस्थिती, जिल्ह्यातील शेती आणि त्यावर आधारित शेतीपूरक उद्योग आदी बाबींची सखोल माहिती घेऊन कृषी-व्यवसाय, पर्यटन आणि अपारंपारिक ऊर्जा सारखे डिप्लोमा/ प्रमाणपत्र अभ्यासक्रम तयार करण्यास मदत करणार आहे.
अभ्यासक्रम समजून घेताना आमदार पाटील व अधिकारी
कौशल्य विद्यापीठामुळे तरुणांना हक्काचा रोजगार मिळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. कौशल्य विद्यापीठ हे उच्च दर्जाचे कौशल्यपूर्ण आणि रोजगारक्षम तरुण निर्माण करण्यासाठी, रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी आणि उच्च दर्जाचे कौशल्य शिक्षण, स्टार्टअप्स, इनक्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन, नोकरीवर आधारित प्रशिक्षण, याला प्रोत्साहन देण्यासाठी एक विशेष विद्यापीठ असणार आहे. त्यातून प्लेसमेंटही मोठ्या प्रमाणात होणार आहे.प्रशिक्षणानंतर मूल्यांकन यंत्रणेमार्फत मूल्यांकन करून पात्र तरुणांना हक्काचा रोजगार मिळण्याच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.