स्वराज्याच्या निर्मितीत वीर जिवाजी महाले त्याचे मूल्य आणि योगदान समाजाला प्रेरणा देत राहणार असून त्यांचे रास्ता पेठ येथील स्मारकाचे काम लवकरच मार्गी लावणार लागेल अशी माहिती आमदार हेमंत रासने यांनी बारा बलुतेदार संघाच्या, सकल नाभिक समाज व शूरवीर जिवाजी महाले स्मारक समितीने आयोजित पुण्यतिथी निमित्त अभिवादन कार्यक्रम प्रसंगी बोलताना त्यांनी दिली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बलुतेदार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष व स्मारकाचे संस्थापक रामदास सूर्यवंशी हे होते. यावेळी आमदार हेमंत रासने यांच्या हस्ते वीर जिवाजी महाले यांच्या पुतळ्यास पुष्पअर्पण करण्यात आले.
याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष रामदास सूर्यवंशी यांनी स्मारकाचे काम लवकर मार्गी लावण्याची तसेच प्रतापगड येथील शिवस्मारक बनवताना तेथे वीर जिवाजी महाले स्वतंत्र दालन उभारण्याची मागणी केली.
कार्यक्रमाच्या वेळी इंद्रजित रायकर, राजेंद्र काकडे, अमित कंक, दिनकर चौधरी, स्मारक समिती अध्यक्ष हेमंत श्रीखंडे, हनुमंत यादव, विनायक गायकवाड, बाळासाहेब भामरे, नितीन पंडित, रवींद्र मावडीकर, चंद्रकांत पोटे, गणेश आहेर, निलेश खडके, अमोल थोरात,परशुराम काशीद, राजू परदेशी,गणेश यादव, सुजित मगर, बाळासाहेब भामरे,विनायक रणदिवे, गोविंद वाघमारे, प्रशांत गायकवाड,अतुल दुसाने, संतोष निवंगुणे, सोहम सूर्यवंशी उपस्थित होते.
याप्रसंगी कसबा अध्यक्ष विनायक गायकवाड यांनी प्रतापगडचा रणसंग्राम या विषयावर व्याख्यान दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन समिती अध्यक्ष हेमंत श्रीखंडे,स्वागत बाळासाहेब भामरे आभार परशुराम काशीद यांनी मानले