मुरुम/प्रतिनिधी
कर्नाटकातील भालकी येथे घडलेल्या महात्मा बसवेश्वर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या विटंबना प्रकरणामुळे मुरूम शहरातील सकल लिंगायत समाजाच्यावतीने शुक्रवारी शहर बाजारपेठ बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते या आवाहनाला व्यापाऱ्यांनी बाजारपेठ बंद ठेवून प्रतिसाद दिला.
मुरूम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लिंगायत बांधव सकाळी 10 वाजता एकत्र आले. महात्मा बसवेश्वर यांच्या नावाने घोषणा देत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली.
भालकी येथे घडलेल्या घटना प्रकरणी निषेध व्यक्त केले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून संभाजीनगर पुन्हा मुख्य मार्गावरून महात्मा बसवेश्वर चौक सिद्धरामेश्वर मठ, अण्णाभाऊ साठे चौक मार्गे सोनार गल्ली व हनुमान चौक इथपर्यंत मोर्चा काढण्यात आला व शेवटी बसवेश्वर चौक येथे
एकत्र येऊन समाज बांधवांनी सदर घटनेचा निषेध व्यक्त करत सदरील घटनेतील आरोपींना अटक करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी केले.
या मोर्चात दत्ता हुळमुजगे, प्रदीप गव्हाणे,जगदीश निंबरगे, राजकुमार लामजने, राजकुमार वाले, मेघराज लादे, गौरीशंकर बोंगरगे शिवा दुर्गे ,ओमकार पाटील ,ओंकार कुंभार संतोष स्वामी ,गणेश वाकळे ,ईश्वर कडगंचे, संदेश आडके ,निनाद ख्याडे यांच्यासह मुरूम शहरवासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते