मुरुम :- शहरातील शाळा विद्यालय महाविद्यालय याशिवाय शासकीय कार्यालय, नगरपरिषद, पोलीस ठाणे, ग्रामीण रुग्णालय,पशुवैद्यकीय दवाखाना याशिवाय विविध राजकीय पक्षांचे कार्यालय, पतसंस्था आदी अनेक ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन ध्वजारोहण करून विविध उपक्रमाने उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला.
मुरूम शहरातील डॉ झाकीर हुसेन उर्दू प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापिका सय्यदा खुतेजा बेगम खतीब यांच्या हस्ते ध्वजारोहण करून ध्वजास मानवंदना देण्यात आली. तसेच राष्ट्रगीत, राज्य गीत, आणि संविधान वाचन करण्यात आले.
1939 ला स्थापना असलेली स्वातंत्र्यपूर्व काळातील शहरातील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे शाळेचे मुख्याध्यापक विजयकुमार देशमाने यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी परिसरातील ज्येष्ठ व्यक्तिमत्व असणारे लोहिया शेटजी यांचे विशेष उपस्थिती होती. त्यच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांसह शहरातील सर्वच शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टीलच्या पाणी बॉटल भेट देण्यात आल्या. तसेच उद्योजक चांद गवंडी यांच्याकडून वुश कंपनीचे वॉशिंग पावडर व साबण भेट देण्यात आले.
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळेचे मुख्याध्यापक अशोक कोळी यांच्या हस्ते शहरातील अनेक मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत तसेच शाळेतील अत्यंत गोंडस व सुंदर चिमुकल्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करून सलामी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या कन्या प्रशालेत माध्यमिकच्या मुख्याध्यापिका मंकावती कांबळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अलका गायकवाड यांच्यासह शाळेतील सर्वच शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसह विद्यार्थी विद्यार्थिनींनी राष्ट्रीय ध्वजा सलामी देऊन मानवंदना देत प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा केला.
याशिवाय कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय येथे भारत शिक्षण संस्थेचे संचालक ज्येष्ठ व्यक्तिमत्व तानाजी फुगटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजास सलामी देण्यात आली. येथीक माऊली पतसंस्थेत प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण सूर्यकांत मिनियार यांनी केले. शांतिनिकेतन शाळेत संस्थेचे अध्यक्ष शरणू मुदकन्ना यांच्या हस्ते ध्वजारोहन झाले.
महात्मा बसवेश्वर पतसंस्थेचे चेअरमन शिवशरण वरनाळे संचालक मनीष मुदकन्ना, अमृत वरनाळे विविध मान्यवर तसेच शाळेतील बालगोपाळांच्या उपस्थितीत राष्ट्रीय ध्वजा सलामी देऊन राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत गाऊन करण्यात आले.
तर प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या मैदानावर विविध विभागाचे पतसंचलन मानवंदना याचा अनेक सांस्कृतिक उपक्रम राबवत उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजात सलामी देत प्रजासत्ताक दिन अनेक कार्यक्रमाने साजरा करण्यात आला.
या सर्व शाळां विद्यालय, महाविद्यालय, शहरातील तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफिस, नगरपरिषद, पोलीस ठाणे यासह विविध राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांचे कार्यालय अशा सर्व ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.
यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली.यात प्रामुख्याने बोलताना अनेकांनी सांगितले की, भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताकात दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान संविधान समितीने २६ नोव्हेंबर, इ.स. १९४९ रोजी स्वीकारले व २६ जानेवारी इ.स. १९५० रोजी पासून भारतीय संविधान अंमलात आले. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.
या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वंदना दिली जाते. भारताचे राष्ट्रगीत, राज्यगीत म्हणले जाते तसेच संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करून आदर व्यक्त केला जातो. हा दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे.
या दिवसाची प्राप्ती हजारो देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. अशा पद्धतीने या प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध ठिकाणी भारतीय प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व शाळेचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले अनेक मान्यवर शहर व परिसरातील शाळेचे कार्यक्रम पाहण्यासाठी आलेले नागरिक व शहरवासीय यांना प्रजासत्ताक दिन व त्याचे महत्त्व याबाबत अनेकांनी मनोगतातून महत्त्व पटवून दिले.