पुणे प्रतिनिधी -
पुण्यातील कोंढवा येथील सम्राट अशोक बुद्ध विहार साईनगर येथे (01ऑक्टोबर) रोजी महारेजिमेंट स्थापना दिन साजरा करण्यात आला.
यावेळी महार रेजिमेंटचे बोध चिन्ह
असलेल्या फ्लॅक्सला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेकांनी
आपले मनोगत व्यक्त करताना सविस्तर माहिती सांगितली. त्यानंतर गुलाब पुष्प देवून उपस्थित्यांचा सन्मान ही करण्यात आला. महारेजिमेंट हे भारतीय सेनेतील एक महत्त्वाचेआणि सर्वात जुन्या सैन्यदलांपैकी एक सैन्य दल आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं 1 ऑक्टोबर 1941 रोजी या महार रेजिमेंटची स्थापना झाली.
महारेजिमेंट ने प्रत्येक युद्धात मत्वपूर्ण कामगिरी करून देशाची सेवा आणि सौरक्षण केले आहे. साधारणतः 1 परमवीर चक्र,4 अशोक चक्र, 32 विरचक्र असे अनेक सन्मान मिळवलेले आहेत.
इतिहास - सन 1892 च्या दरम्यान च्या काळात भारतावर तत्कालीन इंग्रजांचे सरकार होते.आणि त्यावेळी सैन्यात केवल उच्च वर्गाच्या लोकांनाच भर्ती करून घेण्याचा नियम होता.डॉ.अंबेडकर यांचे वडील सूबेदार मेजर रामजी मालोजी सकपाल यांनी सुद्धा या समाजाला भर्ती करून घ्यावी म्हणून प्रयत्न केले होते. 25 वर्षानंतर जेव्हा प्रथम विश्वयुद्ध समाप्त झाल्यानंतर अंग्रेज सरकार ने 1917 में 111 महार ची की स्थापना केली होती. परंतु आर्थिक कारन देत 1920 मध्ये याचे 71 पंजाब रेजीमेंट मध्ये विलीन केले गेले. परंतु डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक प्रयत्नानं 1 ऑक्टोबर 1941 रोजी महार रेजिमेंटची स्थापना झाली.