तयार झालेला पूल असताना तो का वापरात आणला जात नाही, ते कोणाची वाट पाहतोय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सिंहगड परिसरातील महत्वपूर्ण असलेला राजाराम पूल वाहतुकीस तात्काळ सुरु केल्यास प्रवाशांची वाहतुकीची होणारी गैरसोय कमी होईल. परिणामी परिसरात वाहतूक प्रशासनाचा ताण पण कमी होईल.
शनिवारी अनेक जणांनी या वाहतूक कोंडीचे व्हिडिओ सोशल मीडियावर टाकले होते त्यामुळे आज आम आदमी पार्टीचे मुकुंद किर्दत, धनंजय बनकर ,निलेश वांजळे, सतीश यादव ,अक्षय शिंदे सुरेखा भोसले, प्रशांत कांबळे, सुनिता काळे, अनिल कोंढाळकर ,उमेश बागडे ,शिवराम ठोंबरे ,सत्यवान शेवाळे , सुनील सौदी इत्यादी "आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी" सिंहगड रोड वरील राजाराम पूलाची पाहणी केली असता सदरच्या पुलाचे काम डाम्बरीकरणाचे सर्व थर झालेले असून त्यावर पांढरे पट्टे ही मारून झालेले आहेत. असे निदर्शनास आणून दिले.
प्रशासनाने श्रेय घेण्याच्या राजकारणात सहभागी न होता सामान्य माणसाची अडचण समजावून घेऊन वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तातडीने हा पूल खुला करावा अशी मागणी केली आहे.
दोन दिवसात पूल वाहतुकीस खुला करावा अन्यथा आम आदमी पार्टी सामान्य नागरिकाच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन करून वाहतुकीसाठी हा पूल खुला करेल असा इशारा दिला आहे.