गेले 27 दिवसापासून इनक्रेडीबल समाजसेवक ग्रृप चे अध्यक्ष असलम इसाक बागवान हे मुस्लिम ख्रिश्चन समाजाला शैक्षणिक आर्थिक सामाजिक तथा राजकीय क्षेत्रात त्याच्या लोकसंख्ये प्रमाणे आरक्षण मिळावे आणि जाति निहाय जनगणना व्हावी.अॅट्रासिटी कायदा लागू करण्यात यावा.१८ डिसेंबर हा अल्पसंख्याक हक्क दिवस म्हणून शासनाने साजरा करावा या मागणीसाठी कोंढवा खुर्द येथे सत्याग्रह सूरू आहे.
यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा गटाचे आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पुणे शहर अध्यक्ष प्रशांत दादा जगताप,शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे माजी आमदार महादेव आण्णा बाबर, मुस्लिम फ्रंट चे मुन्नवर कुरेशी, महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, भारतीय जनता पार्टी चे अल्पसंख्याक पुणे शहर अध्यक्ष इम्तियाज मोमिन, राष्ट्रवादी महिला आघाडी चे हलिमा शेख,गुलशन शेख तसेच विविध सामाजिक संस्था संघटना तथा पक्षाचे पदाधिकारी तथा कार्यकर्ते यांनी भेट घेवून चर्च्या करून पाठींबा केला.
परंतु काँग्रेस च्या एका ही कार्यकर्त्यांनी भेटी दिलेल्या नाहीत अशी खन्त अस्लम बागवान यांनी व्यक्त केली.
यावेळी हाजी फिरोज शेख, माजी नगरसेवक रहिस सुंडके, मजहर मण्यार, मुन्नवर कुरेशी, अब्दुल बागवान, राजू सय्यद, नाजिया शेख, कांचन बलनायक, अख्तर पिरजादे, अजहर कादरी, सादिक मजाहारी, शोहेब नदाफ कुमेल रजा, अश्फाक बागवान, सादिक पानसरे, बैतूल उलम मदरसाचे तथा इनक्रेडीबल सिव्हिल सर्व्हिस अकेडमी चे विद्यार्थी तथा स्थानिक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.