हडपसर सय्यदनगर येथे आयडियल एज्युकेशन च्या वतीने 78 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य 3000 हून अधिक विद्यार्थ्यांच्या साक्षीने झेंडावंदन करण्यात आले.

पुणे दि.15 : हडपसर मधील सय्यदनगर येथे आयडियल एज्युकेशन ट्रस्ट शैक्षणिक संकुलाच्या वतीने 78 व्या स्वातंत्र्य दिना निमित्य 3000 हून अधिक विद्यार्थ्यांच्या साक्षीने कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सीताराम शरणागत यांच्या शुभ हस्ते झेंडावंदन करण्यात आले.

या कार्यक्रमाची सुरुवात शिक्षकांवृंद व मुलामुलींच्या शिस्तबद्ध प्रभात फेरीने करण्यात आली. या प्रभात फेरीचे नेतृत्व याच शाळेच्या विद्यार्थ्यांच्या बँड पथकाने उत्तम प्रकारे पार पडले. त्यामुळे त्यांचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. बँड पथकाचा जोश आणि विद्यार्थ्यांच्या जयघोषाने परिसर स्वातंत्र्य दिनाच्या उत्साहाणे द्विगुणित झाला होता.


कार्यक्रमाला जयंत वाघ, डॉ. सीताराम शरणागत, रवींद्र हदडरे, बालकृष्ण विधाते, वैभव डांगमाळी, विजय माने, जीवन जाधव, मोहम्मदीन शेख, धर्मराज मेहेत्रे, सुशील मिश्रा, सारिका काका पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

संस्थेचे उर्दू, मराठी, इंग्रजी आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची NCC, स्काऊट गईड ची सलामी देवून प्रमुख अतिथिंचे स्वागत केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सीताराम शरणागत यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून मार्गदर्शनात म्हणाले " आपल्या भारत देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आनेकांनी जीवाची आहुती दिली आहे.त्यामुळे आता नवयुवकांनी शिक्षित होऊन आपल्या देशाचं सार्वभौमत्व टिकवून ठेवावं" आशा भावना व्यक्त केल्या.

या राष्ट्रीय कार्यक्रमासाठी परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिलावर्ग, पालक ही मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे स्वागत संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. शफी इनामदार, कार्याध्यक्ष फहीम इनामदार यांनी केले. तर प्रास्ताविक अल्पसंख्यांक काँग्रेस सोशल मीडिया प्रदेशाध्यक्ष प्रा. शोएब इनामदार यांनी केले.तर उत्कृठ सूत्रसंचालन इम्रान शेख  व वर्षा होले यांनी केले आणि आभार बाबुलाल मनुरे यांनी मानले.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने