पुणे दि.2 ऑगस्ट - प्रतिनिधी :
लोकमत परिवार तर्फे आयोजित विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात अन्नपूर्णा केटरिंग चे संस्थापक श्री संतोष थामी यांना महाराष्ट्रातील केटरिंग व्यवसायातील प्रोफेशनल आयकॉन पुरस्कार प्रदान आला आहे.लोकमतचे संपादक संजय आवटे पड्मभूषण एस बी मुजुमदार, कलाकार चंकी पांडे,दिग्दर्शक प्रवीण तरडे, ऍड हर्षल निंबाळकर,ऍड. कैलास मुंदडा, प्रियांका बर्वे यांच्या हस्ते अन्नपूर्णा केटरिंग चे संस्थापक श्री संतोष थामी यांना महाराष्ट्रातील केटरिंग व्यवसायातील प्रोफेशनल आयकॉन पुरस्कार प्रदान आला आहे.
पुणे येथे दि.29 जुलै रोजी सायंकाळी लोकमत ग्रुप च्या वतीने घेण्यात आलेला विविध पुरस्कार वितरण कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार ओडला.
संतोष थामी यांनी अन्नपूर्णा केटर्सची स्थापना २००७ मध्ये केली आणि आज अन्नपूर्णा केटरर्स रुपांतर एका मोठ्या वृक्षामध्ये झाले आहे. अन्नपूर्णा कॅटर्सच्या 'ग्राहको देवो भव' या भूमिकेमुळे ग्राहक तर संतुष्ट आहेतच.
शिवाय आज अन्नपूर्णा केटरिंगमध्ये असंख्य कार्मचारी कार्यरत असून त्यांच्या त्यांना रोजगार उपलब्ध झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा उत्तम प्रकारे सुरू आहे. अन्नपूणां कॅटर्सच्या स्वयंपूर्णतेचा प्रवास उलगडून दाखवताना संतोष थामी म्हणाले, कोंढवा खुर्द येथील एका सामान्य वस्तीमध्ये माझा जन्म झाला. वडील बुद्धन धामी हे आर्मी कॅन्टिनमध्ये अल्प पगारावर काम करत होते. तीन बहिणी व मी असा आमचा मोठा परिवार असल्याने वडिलांच्या पगारात भागत नव्हते. मी सेंट अँथनी शाळेमध्ये सातवी पर्यंत शिक्षण घेतल्यानंतर शिक्षणाला रामराम ठोकून वडिलांच्या हाताखाली काम सुरू केले. भांडी घासणे, प्लेटा धुणे, चहाचे काम धुणे, अशी कामे केली. मला नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँक मॅनेजमेंट (एनआयबीएम) मध्ये प्रथम हेल्पर महणून काम मिळाले.
"स्वयंपाक कलेचे बाळकडू वडिलांकडून मिळाल्यामुळे एन आय बी एम मध्ये जेवण तयार करून देण्याची संधी मिळाली आणि त्या संधीच अन्नपूर्णा केटरिंगच सोन झालं असं ते म्हणाले.
यांची लोकमत ने दखल घेवून सन्मानपूर्वक आयकॉन पुरस्कार दिला. यावेळी अनेक यशस्वीतेंचा सन्मानपूर्वक पुरस्कार प्रदान करून त्यांना प्रोत्साहन देण्यात आले.