पुणे दि. 27 - राज्यात होत असलेल्या महिला अत्याचार, हिंसाचाराच्या घटना हया प्रगत पुरोगामी महाराष्ट्राला काळिमा फासणाऱ्या आसुन अडीज तीन वर्षांच्या लहानग्या चिमुकल्या मुलींवर सुद्धा असे गंभीर अत्याचाचे प्रकार होत असल्याने कुठे चालला आहे, "छत्रपती शिवाजी महाराज, माता जिजावु आणि फुले, शाहू, आंबेडकर, यांचा महाराष्ट्र असा प्रश्न सर्व सामान्यांना पडतो आहे.
बदलापूर सह राज्यात लैंगिक अत्याचार झालेल्या विविध घटनांचा निषेध करण्यासाठी आज दि.25 आगस्ट रोजी दांडेकर पूल, पुणे येथे सर्वपक्षीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये दोन वर्षांच्या मुलींपासून ते 14 वर्षांच्या चिमुकल्या मुली ही रस्ता रोको आंदोलनात फलक घेवून हिरीरीने सहभागी झाल्या होत्या. अत्याचार करणाऱ्यांना फाशी द्या, असे फलक घेऊन निषेध नोंदवला.
यावेळी फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या माजी अध्यक्ष ऍड. वैशाली चांदणे, रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण, ज्येष्ठ नेते अनिल गायकवाड, मच्छिंद्र गायकवाड, आरपीआयचे तानाजी ताकपेरे, गणेश गाडे, मामा भोसले, अमोल शिंदे, पंचशीला कुडवे, अजय भालशंकर, ऍड. किरण कदम, हनुमंत फडके, मुकुंद गायकवाड आणि राहुल गायकवाड असे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
ऍड. वैशाली चांदणे म्हणाल्या की, फास्टट्रॅक कोर्टात खटले चालवून आरोपींना जलद गतीने फाशीची शिक्षा द्यायला हवी. आई-वडिलांनी मुलगा मुलगी भेद न करता मुलांवर चांगले संस्कार करावेत, जेणेकरून कोणत्याही मुलीवर मुलांची वाईट नजर जाणार नाही.
रुग्ण हक्क परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण म्हणाले की, मुली सुरक्षित नाहीत. विविध गुन्हेगारी घटना रोज सुरू असताना आता चिमुकल्या मुलींवर भयंकर गंभीर लैंगिक अत्याचार केले जात आहेत, यासाठी शक्ती कायदा तात्काळ पारित करावा.
यावेळी हिराबाई शिंदे, उज्वला चव्हाण, आशाबाई शेंडगे, राणी शिंदे, सुरेखा गायकवाड आणि असंख्य चिमुकल्या लहान मुली उपस्थित होत्या.