शेतात काम करताना विषारी सापाने दंश केल्याने महिलेचा दुर्दैवी मृत्यू


उमरगा दि.14 प्रतिनिधी,

धाराशिव जिल्हा उमरगा तालुक्यातील केसर जवळगा येथील शेतकरी कुटुंबातील 36 वर्षीय शेतकरी महिला शेतात काम करत असताना विषारी साप चावल्याने मरण पावली

सदरील शेतकरी महिला निर्मला हणमंत लकडे वय 36 ह्या दि.13 शनिवारी सकाळी 8 च्या सुमारास शेतात गेल्या होत्या.

शेतातील ज्वारीचे कडबा काढताना त्यांना सापाने दंश केल्या आणि त्यां कांही वेळात बेशुद्ध झाल्या. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात घेऊन जाताना उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.

त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा,दोन मुली असा परिवार आसुन  मुरूम येथील सरकारी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉ महेश बेंबळगे, डॉ सिफणा तांबोळी यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांकडे सोपविण्यात आले शनिवारी सांयकाळी 4 च्या सुमारास केसरजवळगा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आला. त्यांच्या अशा निधनाने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.


Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Popular Items