पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने पुण्यात जिल्हाधिकारी कार्यालय समोर विशाळगड, गजापुर हिंसाचार व महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

पुणे दि.18, प्रतिनिधी -

पुणे शहर जिल्हा काँग्रेसच्या वतीने विशाळगड, गजापुर हिंसाचार व महायुती सरकार विरोधात आंदोलन करण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, जिल्हाधिकारी कार्यालय येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी धार्मिक शांतता, सलोखा अबाधित राहण्यासाठी मौन आंदोलन करून घटनेचा आणि शासनाचा निषेध करण्यात आला.

यावेळी पुणे शहराध्यक्ष अरविंदजी शिंदे, माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, मा.आमदार दिप्तीताई चवधरी, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभयजी छाजेड, महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्षा संगीताताई तिवारी, मा महापौर कमलताई व्यवहारे, मा गटनेते आबा बागुल, मा नगरसेवक अजित दरेकर, मा नगरसेवक रफिक शेख, मा नगरसेविका लताताई राजगुरू,मा नगरसेविका सुजाताताई शेट्टी, सुनील शिंदे, मा नगरसेवक मुख्तार शेख, अल्पसंख्याक पुणे शहराध्यक्ष समीर शेख, बळीराम डोळे, देवदास लोणकर, सौरभ अमराळे, सतीश पवार, जावेदभाई निलगर,  पुणे शहर सरचिटणीस उषाताई राजगुरु, नुर शेख, सुनील घाडगे, व इतर सहकारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post