पुणे दि.10 जुलै प्रतिनिध
महागाईच्या झळा दिवसेंदिवस गगणाला भिडत आहेत. 150 रुपये चा मोबाईल रिचार्ज 300 ला आणि 600 चा रसोई गैस 1150 रुपयेला तर 25 रुपये किलोचा गेहू 50 रुपयेला झाल्याने सर्वसामान्यांनी जगायचं कसं असा प्रश्न पडलेला आहे. सर्वसामान्यांना होरपळून टाकनाऱ्या महागाईमुळे नोकरीत असणाऱ्या कुटूंबाला खर्च पेलवत नसताना हजारो महिला आज घरकाम करून आपले कुटुंब सांभाळत, आपल्या मुलांना उच्चाशिक्षण देत आहेत.
रविवार 7 जुलै रोजी जनवाडी डिफेन्स कॉलनी हॉल येथे गोखलेनागर भागातील धुणीभांडी, स्वयंपाकपाणी करून मोलमजुरी करून अशा मुला-मुलींना वाढवणाऱ्या ७५ महिलांचा सत्कार आम आदमी पार्टीच्या वतीने करण्यात आला.
यावेळी "मिळून साऱ्याजणी, मासिकाच्या संपादका वि. म.गीताली आणि आपचे मुकुंद कीर्दत उपस्थित होते.
यावेळी बोलताना वी. म. गीताली म्हणाल्या की,
"शिक्षणामुळे जगताना मान मिळतो, हे लक्षात घेऊन या कष्टकरी महिलांनी आपल्या मुलांना शिकवलं. आपल्या मुला-मुलींना त्यांच्या पायावर उभा करण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आसुन त्यांनी त्यांच्या कामाला कमी मानू नये ! कारण ते काम अतिशय मोलाचं आणि सेवेचं असल्याचे सांगितले.
आपचे पुणे शहर महिला अध्यक्षा "सुरेखा भोसले म्हणाल्या की," आम आदमी पार्टी नेहमीच घरकाम करणाऱ्या महिलांचे जीवन सुकर व्हावे यासाठी दिल्लीमध्ये आणि पंजाब मध्ये मोफत प्रवास, मोफत शिक्षण मोफत आरोग्यसेवा आणि मोफत वीज देवून त्यांना सर्वतोपरी मदत करीत असल्याचे सांगितले. त्यामुळं मोठ्या प्रमाणावर आम आदमी पार्टीला महिला मतदान करत आहेत असे सांगितले
काबाडकष्टाची, परिश्रमाची आणि जिद्दीची दखल
- मुकुंद कीर्दत
घरच्या परिस्थितीला सामोरे जात कष्ट करत, परिस्थितीशी दोन हात करत, चिकाटीने मुलांना घडवले,उत्तम शिक्षण दिले, त्यांचे आयुष्य बदलले, त्यांच्यासाठी या महिला ‘जिजाऊमाता’ बनल्या. त्यांच्या या काबाडकष्टाची, परिश्रमाची आणि जिद्दीची दखल घेत हा सन्मान आम्ही केला असे मुकुंद किर्दत यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. गिरीजा गोडबोले यांनी केले.कार्यक्रम यशस्वीकरण्यासाठी शिवराम ठोंबरे ,अमोल मोरे, सतीश यादव, विकास चव्हाण, शंकर थोरात, विकास लोंढे, रहीम खान, निलेश वांजळे, सागर कानगुडे, संदेश सोलकर आदींनी परिश्रम घेतले.