जागतिक डॉक्टर्स दिना निमित्त ससून येथे करण्यात आला डॉक्टरांचा सन्मान

पुणे दि.05 प्रतिनिधी.

डॉक्टर्स दिनानिमित्त पुण्यातील ससून येथे एम जी हॉल सभागृहत 1 जून रोजी डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र एस एफ ऑल मेनिफॅक्चरर लेबर युनियन संस्थापक अद्यक्ष अहमद खान यांनी केले होते.

या वेळी उपस्थित डॉक्टरांचा शाल व ट्रॉफी देवून सत्कार व  सन्मान करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सासून सर्वपचार रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक मा.यलापा जाधव आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष आडवोकेट संतोष खामकर हे उपस्थित होते.

यावेळी सासूनचे अनेक वैद्यकीय अधिकारी व युनियनचे संस्थापक अध्यक्ष अहमद खान कार्याध्यक्ष किशोर समिंदर,आनंद पाटील,उपाध्यक्ष अब्दुल गणी शेख,सचिव अल्ताफ खान,जावेद शेख, इम्तियाज शेख,सल्लागार धुधेकुल्ला,सदस्य सुरेंद्र लोंढे,रमेश नायर,रफिक मुल्ला,ऍडव्हान्स मोहन सोनवणे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते. तर माजी आमदार महादेव अण्णा बाबर यांनी यांनी ही कार्यक्रमास भेट शुभेच्छा दिल्या.

पुण्यात महाराष्ट्र एस एफ ऑल मेनिफॅक्चरर लेबर युनियन च्या माध्यमातून कारागीरांच्या आडीअडचणी सोडवण्याचे काम करते. व सामाजिक जबाबदारी म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणायांचा मानसन्मान करून त्यांना प्रोत्साहन ही देत असते.
Mnk News Media

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

थोडे नवीन जरा जुने

Featured Post