आरटीईच्या अडीज लाख मुलांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवा - आम आदमी पार्टी पुणे

पुणे दि. 23, प्रतिनिधी-

RTE च्या अडीच लाख मुलांच्या शिक्षणाचा खेळ खंडोबा थांबवा? अन्यथा आंदोलन आणखीन तीव्र करू असा इशारा  पुण्यात आम आदमी पार्टी, पालक युनियन च्या कार्यकर्त्यांनी  सरकारला दिला.

आरटीई च्या  खाजगी शाळांमधील राखीव जागा प्रवेशासंदर्भात सरकारच्या नवीन आदेशाला कोर्टाने स्थगिती दिलेली आसुन सुद्धा सरकारने तो नवा आदेश मागे घेतला नाही.  त्यामुळे आरटीई राखीव शाळा प्रवेश प्रक्रिया यावेळी तब्बल 2 महिने रखडली आहे. महाराष्ट्रात जवळपास अडीच लाख पालकांनी आरटीई अर्ज भरले असून त्यांची मुले या प्रवेश प्रक्रियेची वाट पाहत आहेत.

कोर्टाने सरकारच्या नव्या आदेशाला स्थगिती दिलेली आसुन हि, सरकारने हा अधिनियम रद्द केलेला नाही. परिणामी त्याबाबत हस्तक्षेप याचिका कोर्टात दाखल होत आहेत. या वेळ खाऊ प्रक्रियेमुळे यावर्षीची RTE प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. सरकारने हा अधिनियमच रद्द केला तर आक्षेप घेणे थांबतील आणि अडीच लाख मुलांचे प्रवेश निश्चित होवून शैक्षणिक नुकसान होणार नाहीत असे आप पालक युनियनचे म्हणणे आहे.

विडिओ पाहण्यासाठी  टच करा    

शासनाने काढलेल्या आदेशास उच्च न्यायालयाने शिक्षण हक्क विरोधी ठरवत स्थगिती दिली आहे परंतु शासनाने कायदा अधिसूचना मागे न घेतल्याने त्या बाबत खाजगी शाळा विविध हस्तक्षेप याचिका दाखल करीत आहेत. त्यांच्या सुनावणीस तारखा पडत असल्याने शाळा प्रवेश लॉटरी जाहीर करण्यास विलंब होत आहे. हा नवा आदेश युती सरकारने मागे घ्यावा आणि प्रवेश प्रक्रिया तातडीने सुरू करावी अशी मागणी करत आप पालक युनियन ने पुण्यात दि.23 जून रोजी आंदोलन केले.

 "शालाबाह्य अडीच लाख मुलांना खाजगी शाळांमध्ये लॉटरी लागून प्रवेश मिळेल की नाही याची शाश्वती नाही. त्यामुळे पालक द्विधा मनस्थितीत आसुन इतर मुले मात्र शाळेत जावू लागल्याने मोफत प्रवेशाची वाट पाहत असलेल्या मुलांच्या मानसिकतेवर परिणाम होतो आहे. याला शिक्षणमंत्री केसरकर आणि युती सरकारच जबाबदार आसल्याचा आरोप" "आम आदमी पार्टीचे राज्य प्रवक्ते मुकुंद किर्दत यांनी आंदोलन स्थळी कार्यक्रमात बोलताना केला.

तर शहराध्यक्ष सुदर्शन जगदाळे, यांनी "सरकारने नवा आदेश मागे न घेतल्यास शिक्षणमंत्री केसरकर यांना पुण्यात फिरु देणार नाही" असा इशारा दिला.

यावेळी श्रीकांत भिसे, राजू देवकर, उमेश परदेशी, प्रभाकर तिवारी, विनोद परदेशी,नामदेव वाघमारे,नरेश परदेशी,जगन्नाथ जमादार, स्वाती राजणे, खुशबू तिवारी,सुनील सपकाळ,सुमित वालीकर, प्रमिला भिसे, शालिनी परदेशी, ऋषिकेश भिसे, दशरथ आदमाने, उमर शेख, आरती परदेशी, प्रकाश परदेशी, तुषार कदम, लक्ष्मी मडिवाल, हनुमंत शिंदे,आनंदा हनुमंत, अहमद बागवान, नितिन गस्ती, गणेश खेंगरे,तानाजी जाधव,शंकर मडीवाल,राजेश पिसाळ, प्रीती परदेशी, गावस्कर सेथी, राजू कढणे, दीपक पारकर,राजेश ओवळ, दीपक बनसोडे, रूपाली फडतरे, विनायक वीर, प्रिया जमादार,सीमा शिवतारे, अमोल आडागळे, प्रफुल्ल तायडे, स्वाती रासगे ,विकी बहादुर आदी वंचित व दुर्बल घटकातील पालक सामील झाले होते.  

शिवाय अमित म्हस्के, निलेश वांजळे, निरंजन अडागळे, सतीश यादव, मनोज शेट्टी, संतोष काळे, किरण कांबळे, उमेश बागडे, प्रशांत कांबळे, सुरेखा भोसले, सुरज सोनवणे, सुभाष करांडे, बाबासाहेब जाधव, सुशील बोबडे, ॲड गुणाजी मोरे, विक्रम गायकवाड, ॲड गणेश थरकुडे, शिवराम ठोंबरे, नौशाद अन्सारी, निखिल खंदारे, अविनाश केंदळे,सुनील सवदी, ज्ञांनेश्वर गायकवाड अविनाश भाकरे, विकास लोंढे, कीर्तीसिंग चौधरी, रमेश मते, जीत विश्वकर्मा, सुनील भोसले व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Mallinath Gurave

सत्य रोखठोक निर्भीड निःपक्षपाती वार्तांकन

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने

Featured Post